करदाते कोणत्याही प्रकारच्या कर-जाचापासून मुक्त राहतील, याची हमी देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांन सांगितलं आहे. कर कायद्यामध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच यावेळी त्यांनी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा त्यात काही घोटाळा झाला तरी खातेदाराच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतील अशी घोषणा करत खातेदारांना दिलासा दिला.
#Budget2020 : करदात्यांना मोदी सरकारचा दिलासा, असे आहेत नवे टॅक्स स्लॅब…
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा > https://t.co/Ul77AoR5m3#BudgetSession2020 #NirmalaSitharaman pic.twitter.com/RjD6Gk2Uew
— LoksattaLive (@LoksattaLive) February 1, 2020
आणखी वाचा – Budget 2020 – स्वच्छ हवेसाठी मोदी सरकारकडून ४,४०० कोटींची तरतूद
पंजाब आणि महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याने धास्तावलेल्या सर्व बँकांच्या खातेदारांना सरकारने दिलासा दिला आहे. बँक डिपॉझिट इन्शुरन्स योजनेत बदल करण्याची घोषणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करु अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. बँकाची स्थिती आणि ग्राहकांच्या ठेवीच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणा उभारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.