केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्याप्रमाणे मुलींच्या लग्नासाठी वय वाढवण्यात आलं त्याप्रमाणे आई होण्याच्या वयोमर्यादेवर केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती निर्मला सीतारमन यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करणार आल्या आहेत. महिलांसाठी विशेष उपक्रमांना २८ हजार ६०० कोटी रुपयांची घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं, आता मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही विचार करणार आहोत. यासाठी एका टास्क फोर्सची निर्मिती केली जाईल. ही टास्क फोर्स सहा महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे,” अशी ममाहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

आणखी वाचा – Budget 2020: उडाण योजनेंतर्गत १०० नवी विमानतळं उभारणार

निर्मला सीतारामन यांनी यावेळी अंगणावाडी कार्यकर्त्यांना सहा लाखाहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्यांना स्मार्टफोन देण्यात आला असल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबद्दल सांगितलं. यावेळी विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. निर्मला सीतारामन यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला चांगला पाठिंबा दिला मिळाला असून मुलगी-मुलगा गुणोत्तरात सुधारणा झाली असल्याचा दावा केला.