सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्वावर देशात आणखी पाच नव्या स्मार्ट सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सन २०१५ मध्ये देशात १०० शहरे स्मार्ट करण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अनेक शहरांमध्ये या योजनेंतर्गत अद्यापही कामं सुरु आहेत, तर काही ठिकाणी रखडली आहे. त्यानंतर आता आणखी पाच शहरं सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मात्र, ही शहरे कुठली असतील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

आणखी वाचा – Budget 2020 : २० लाख शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार

दरम्यान, गुंतवणूक वाढवण्यासाठी एका विशेष सेलची स्थापना तसेच निर्यातीसाठी ‘निर्वित’ योजना आणणार असल्याचे यावेळी सीतारामन यांनी सांगितले. त्याचबरोबर पीपीपी तत्वावर ५ स्मार्ट सिटी विकसीत करण्यात येणार आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रिक उपकरणं बनवण्यासाठी विशेष सहाय्य सरकारकडून दिलं जाणार आहे. १६ अब्ज रुपयांचं कापड आपण आयात करतो ही आयात थांबवण्यासाठी १८०० कोटी रुपयांचे सहकार्याने विशेष योजना सरकार सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आणखी वाचा – Budget 2020 : १५० नव्या हायस्पीड ट्रेन, मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे – अर्थसंकल्पात घोषणा

त्याचबरोबर निर्यातदारांनच्या मदतीसाठी ‘निर्भिक’ या नावानं योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यांना विम्याचा कमी हप्ता द्यावा लागेल. आयातीवर कर वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच निर्यातीवर मोदी सरकार भर देणार असल्याचे सीतारामन यावेळी म्हणाल्या.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2020 five new smart cities to be built in the country on ppp basis aau