एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतील सरकारची भागिदारी विकणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही माहिती दिली.
Finance Minister Nirmala Sitharaman: Government proposes to sell a part of its holding in LIC by initial public offer. #BudgetSession2020 pic.twitter.com/j8gAKPXNJ8
— ANI (@ANI) February 1, 2020
सीतारामन म्हणाल्या, एलआयसीचा नवा इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओद्वारे सरकारने एलआयसी आणि आयडीबीआय बँकेत आपल्या भागीदारीचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठी सरकारने वित्त आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या आहेत.
Finance Minister Nirmala Sitharaman: Mechanism will be made to address liquidity constraints of NBFCs and Hosue finance corporations. Govt to offer support by guaranteeing securities floated to provide liquidity for NBFCs
— ANI (@ANI) February 1, 2020
आणखी वाचा – Budget 2020: करदात्यांना मोदी सरकारचा दिलासा, असे आहेत नवे टॅक्स स्लॅब
दरम्यान, २०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतर सरकारने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी (एनबीएफसी) अंशतः कर्ज गॅरंटीची नवी योजना तयार केली आहे. त्याचबरोबर सरकारी रोखे हे अनिवासी गुंतवणूकदारांसाठी देखील काढण्यात येतील, असेही यावेळी सितारामन यांनी स्पष्ट केलं.