केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकरी, बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, बँक खातेदार, उद्योजक या सगळ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला आहे. तरीही सर्वात महत्त्वाची बाब आहे ती करदात्यांना मिळालेला दिलासा.
करदात्यांच्या कररचेनत मोदी सरकारने बदल केला आहे. पाच ते साडेसात लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर, 7.50 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15 टक्के कर, 10 ते 12.5 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर तर ज्यांचं करपात्र उत्पन्न 12.5 लाख ते 15 लाख आहे त्यांना 25 टक्के कर आकारला जाणार आहे. ज्यांचं करपात्र वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 30 टक्के कर आकारला जाणार आहे. वार्षिक उत्पन्न पाच लाखांपर्यंत असणाऱ्यांना करातून सूट देण्यात आली आहे.
दरम्यान मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 16 मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करत आहेत आणि दुसरीकडे शेअर बाजाराचा निर्देशांक 582 अंकांनी कोसळला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे
५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर १० टक्के कर ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर २० टक्के कर लागणार १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार १५ लाखांपुढच्या करपात्र उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर लागणार
एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. LIC चा आयपीओ आणला जाणार असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं
बँकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ती करणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आमच्या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
बँक दिवाळखोरीत निघाली तरी 5 लाख रुपयांपर्यंत ठेवी सुरक्षित राहतील असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं
जी 20 परिषदेचं भारतात आयोजन केलं जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. जी 20 परिषदेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
झारखंडमध्ये आदिवासी म्युझियम तयार करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. सांस्कृतिक खात्यासाठी 3150 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे असंही त्या म्हणाल्या. पर्यटन विकासासाठी 2 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट मांडत दुपारी १२:२० वाजता असताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९० अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टीही ५५ अंकांनी खाली आला होता.
मागासवर्गीयांसाठी 85 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमातींसाठी 53 हजार 700 कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
ग्रामीण भागात इंटरनेटचं जाळं पसवरणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेट पसरवलं जाणार. यासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
उडान योजने अंतर्गत नव्या 100 विमानतळांची निर्मिती केली जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार अशीही घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली. तसंच 2 हजार किमीचे सागरी रस्ते बांधले जाणार असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तर पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. स्कील डेव्हलपमेंटवर 3 हजार कोटी खर्च करणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भारतात तयार झाल्या पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्रांची निर्मिती करणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
कृषी आणि सिंचनासाठी 2.83 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. विविध योजनांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कृषि आणि सिंचन क्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद करून सीतारामन यांनी शेतकऱ्यांची मने जिंकली.
स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.
किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
अन्नदाता उर्जादाता बनवण्यावर आम्ही भर देणार आहोत. जलसंकटात असलेल्या 100 जिल्ह्यांना अर्थसहाय्य देणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. शेत जमिनींचा वापर चांगल्या पद्धतीने करुन अधिक उत्पन्न कसं घेता येईल यावर आमचा भर असणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.
अर्थसंकल्पात गरीबांसाठी विविध योजना आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. सबका साथ सबका विकास हे या सरकारचं सूत्र आहे. याचाच विचार अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
एप्रिल 2020 पर्यंत जीएसटीचं नवं व्हर्जन येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. 27 कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले असंही त्यांनी यावेळी सांगितलं. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला यश आलं असंही त्या म्हणाल्या.
60 लाख नवे करदाते निर्माण झाले. आयुष्मान योजनेचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक योजनांमुळे ग्रामीण भागातल्या लोकांना लाभ झाला.
आपल्या देशातील बँकांची स्थिती सुधारली. बँक व्यवस्था सुधारण्यात आम्हाला यश आलं. देशातील इन्स्पेक्टर राज संपवण्यात यश आलं. असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे
जीएसटी कर लागू करणं हे देशाच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल होतं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसंच महागाई नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आलं असंही त्या म्हणाल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली आहे. मोदी सरकारला जनतेने बहुमत देऊन निवडून दिलं याबाबत त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यासाठी भाजपाच्या खासदार हेमा मालिनी, सनी देओल संसदेत उपस्थित झाले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं कुटुंबही संसदेत उपस्थित आहे. त्यांची मुलगीही संसदेत आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. आता कॅबिनेटच्या बैठकीनंतर बजेट सादर केलं जाणार आहे.
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत आणण्यात आल्या आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे
आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात पडझडीने झाली आहे. सेनेक्स 126 अंकांनी घसरला आहे. आता दिवस संपताना यामध्ये काही वाढ होते का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे
गेल्या वर्षापासून बजेटच्या ब्रीफकेसला निर्मला सीतारामन यांनी रामराम केला आहे. त्या सादर करतात तो अर्थसंकल्प एका बही खात्यामध्ये गुंडाळलेला असतो. गेल्या अनेक वर्षांपासून बजेट म्हणजेच अर्थसंकल्प हा एका ब्रीफकेसमध्ये असायचा. मात्र ही परंपरा निर्मला सीतारामन यांनी बंद करुन बही खात्याची परंपरा सुरु केली आहे. या बही खात्यावर राजमुद्रा असते.
Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman with 'Bahi-Khata' ahead of presentation of Union Budget 2020-21 pic.twitter.com/QyGTHmAhfh
— ANI (@ANI) February 1, 2020
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत दाखल झाल्या. आता त्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेल्या आहेत. आज त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.