केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये भविष्यामध्ये भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे देशभरातील वेगवेगळ्या शहरांना देण्यात आलेल्या निधीमध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे. मात्र एकीकडे मुंबईमधील मेट्रोच्या कामामध्ये केंद्र सरकार खोडा घातला असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीका केली आहे. केंद्राने मुंबईतील मेट्रो कारशेडची जमीन मंगळावरुन आणलीय की चंद्रावरुन?, असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in