मुंबई : पंतप्रधानांच्या ’मेक इन इंडिया’ मोहिमेचा प्रसार करण्यासाठी ‘उद्योजकांसोबत एक संध्याकाळ’ आयोजित करणारी सरकारी देना बँक या बाबतीतील पहिल्या काही बँकांपकी एक ठरली आहे. मुंबईतील उपनगात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तरुण उद्योजकांनी त्यांचे बँकेबल व कल्पक व्यवसाय प्रस्ताव घेऊन पुढाकार घ्यावा म्हणून देना बँकेने या उद्योजकांचे स्वागत करत व्यवसाय व उद्योजकतेच्या प्रेरणेला पािठबा दिला आहे. या वेळी अश्विनी कुमार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक), आर. के. टक्कर (कार्यकारी संचालक) आणि त्रिष्णा गुहा (कार्याकारी संचालिका), तसेच बँकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील उगवत्या उद्योजकांसोबत आयोजित कार्यक्रमात देना बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार म्हणाले, उद्योजक बनण्याची आकांक्षा असलेल्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बँक नियमितपणे संवाद कार्यक्रम आयोजित करत आहे. अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती करण्यासाठीही मदत होईल. ‘मेक इन इंडिया’संदर्भातील बँकेच्या विविध योजना व अलीकडच्या घडामोडी यामुळे तरुण उद्योजकांन त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. तरुण उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी देना बँक रिटेल, कृषी व एसएमई क्षेत्रांवर भर देत असून आपले जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. कृषी, गृह कर्जासाठी बँक आपल्या जाळ्यामार्फत तसेच भोपाळ, इंदूर व रायपूरसारख्या शहरांमध्ये शाखा सुरू करून ‘मेगा क्रेडिट कॅम्प’ दाखल करत आहे.
नाबार्डचा टाटा ट्रस्टसोबत सहकार्य करार
मुंबई : नाबार्डने सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टसोबत करारावर स्वाक्षरी केली. या कराराचा उद्देश गरीब प्रदेशात आणि समुदायात सामाजिक-आíथक उत्थान आणून विकास करणे आहे. या करारावर सर दोराबजी टाटा ट्रस्टचे (एसडीटीटी) कार्यकारी विश्वस्त आर. वेंकटरामनन व नाबार्डचे मुख्य सर व्यवस्थापक पी. राधाकृष्णन यांनी स्वाक्षरी केली. यावेळी एसडीटीटीचे अध्यक्ष रतन टाटा, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला हेही उपस्थित होते. या दोन्ही संस्थांकडील स्त्रोतांचा उपयोग करून अधिक प्रामाणिक मार्गानी गरीब क्षेत्रात प्रगती दिसून येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या करारानुसार, या दोन्ही संस्था लघु-पायाभूत सुविधा, आंतर-ग्राम पायाभूत सुविधा विकास यासंबंधी सुयोग्य कार्यक्रमाचे आरेखन करून योग्य विकास घटकांचा, ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या पर्यायी मार्गाचा प्रसार इत्यादीचा वापर करून त्यांची अमलबजावणी करतील. काही कार्यक्रमांची अमलबजावणी करण्यावर नाबार्ड आग्रही असून त्यांचा कल संवर्धन, स्थिर रोजगार उपलब्ध करून देऊन नसíगक स्त्रोतांचा अर्निबध वापर थांबवण्यावर असेल. तसेच रोजगार निर्मिती, महिला सबलीकरण, वित्तीय सहभाग इत्यादीवर भर देण्यात येईल. सुमारे १८ संस्थांच्या सहभागातून ९७ कोटीची तरतूद करण्यात आली असून त्यात सहभागी संस्थांचे ४१% वाटा आहे. या रकमेतून सध्या ८५ प्रकल्प कार्यान्वित करण्याची योजना आहे.
पिअरलेस म्युच्युअल फंडाची निव्वळ उलाढालीची अट पूर्ण
मुंबई : पिअरलेस म्युच्युअल फंडाचे मालमत्ता व्यवस्थापक असलेल्या पिअरलेस फंड्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने (पीएफएमसीएल) त्यांची प्रवर्तक कंपनी असलेल्या पिअरलेस जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडमार्फत (पीजीएफआय) २४ कोटींच्या भांडवली गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे पीएफएमसीएलचे निव्वळ मूल्य ३८ कोटीं रुपयांवरून ६२ कोटी रुपये झाले आहे. सेबीने फेब्रुवारी २०१४ मध्ये दिलेल्या दिशानिर्देशानुसार म्युच्युअल फंडांसाठी निव्वळ मूल्य १० कोटींवरून ५० कोटी केल्याने ही गुंतवणूक करण्यात आली आहे. फंडांना या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. याविषयी पीएफएमसीएलचे अध्यक्ष आणि पीजीएफआयचे संचालक पार्थो सारथी दत्ता म्हणाले, पिअरलेस समुह संयम व एकात्मिकतेच्या माध्यमातून दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यासाठी कटीबद्ध आहे. विविध ग्राहकांसाठी विश्वासार्ह पद्धतीने वित्तीय उत्पादने व सुविधा पुरविण्यासाठीही समूह कटीबद्ध आहे. पिअरलेस म्युच्युअल फंड हे त्याचे उदाहरण आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
पराग मिल्क फूड्सतर्फे नव्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : गोवर्धन, गो, प्राइड ऑफ काऊज व टॉ अप अशी लोकप्रिय उत्पादने असलेल्या पराग मिल्क फूड्स (प्रा.) लि.ने नव्या बोधचिन्हाचे सादरीकरण नुकतेच मुंबईत केले. पराग मिल्क फूड्सने दूधविषयक नव्या श्रेणींमध्ये प्रवेश करण्यासाठी वाढीचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आपल्या ब्रँड पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी आकर्षक योजना आखल्या असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी यानिमित्ताने दिली. कंपनीने झटपट पोषण व समाधान हवे असलेल्या ग्राहकांसाठी ‘टॉप-अप’ ब्रँडमार्फत डेअरी-आधारित पेयांमध्येही प्रवेश केला आहे. शहा म्हणाले, गेल्या कालावधीत आम्ही दोन आकडी व्यवसाय वाढ साध्य केली. येत्या काही वर्षांसाठी भविष्यातील आमच्या योजना ५०% वाढीव वृद्धिदरासह प्रेरणादायी आहेत. नव्या श्रेणींमध्ये प्रवेश करून आणि आमच्या पोर्टफोलिओमध्ये नवे ब्रँड दाखल करून ते साध्य केले जाईल.
संरक्षणमंत्र्यांकडून ‘चितारी ट्रॅव्हल्स’चा गौरव
मुंबई : गेल्या ४५हून अधिक वर्षांतील पर्यटन क्षेत्रातील योगदान आणि काश्मीर धुमसत असतानाही तेथे अगदी सीमाभागापर्यंत पर्यटकांना नेऊन सुरक्षितपणे सहली आयोजण्याच्या कामगिरीबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चितारी ट्रॅव्हल्सचे प्रमोद चितारी यांचा सत्कार केला. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात अलीकडेच या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदर याच कामगिरीसाठी काश्मीर सरकारने काश्मीर रत्न आणि जीवनगौरव पुरस्कार देऊन चितारी यांना गौरविले आहे.
देना बँकेतर्फे उगवत्या उद्योजकांसाठी आíथक व सल्लाविषयक पािठबा
पंतप्रधानांच्या ’मेक इन इंडिया’ मोहिमेचा प्रसार करण्यासाठी ‘उद्योजकांसोबत एक संध्याकाळ’ आयोजित करणारी सरकारी देना बँक
First published on: 03-02-2015 at 07:49 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Business newscommerce