कॉसमॉस बँकेच्या व्यावसायिक, औषध विक्रेत्यांसाठी कर्ज योजना
मुंबई : सहकार क्षेत्रातील आघाडीच्या दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने व्यावसायिक तसेच औषध विक्रेते यांच्यासाठी दोन नव्या कर्ज योजना सादर केल्या आहेत.
‘कॉसमॉस प्रोफेशनल्स कर्ज योजना’ व घाऊक तसेच किरकोळ औषध विक्रेत्यांसाठी ‘विशेष कर्ज योजना’ अशी त्यांची नावे असल्याचे मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी घोषित केले. पहिल्या योजनेंतर्गत डॉक्टर, अभियंते, सनदी लेखापाल, कंपनी सचिव, स्थापत्यकार आदींना व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वार्षिक १२.५० टक्के दराने तर औषध विक्रेत्यांना दहा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज वार्षिक ११.५० टक्के दराने उपलब्ध झाले आहे.
२७,३५० कोटी रुपयांहून अधिक एकूण व्यवसाय असलेल्या कॉसमॉस बँकेच्या विविध सात राज्यांत १४० शाखा आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in