ब्रॉडबॅण्ड वायरलेससाठीचे ध्वनिलहरी परवाने परत केल्यापोटीचे सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांचे ११,२५८.४८ कोटी रुपये देण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत मान्य करण्यात आले. यानुसार एमटीएनएल व बीएसएनएलला ही रक्कम विभागून मिळणार आहे.
२०१० मध्ये याबाबतच्या ध्वनिलहरींसाठीच्या लिलावात या दोन्ही कंपन्या सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र त्यासाठीचे शुल्क म्हणून बीएसएनएलने ८,३१३.८० कोटी रुपये तर एमटीएनएलने ४,५३४ कोटी रुपये भरले होते.

Story img Loader