वाहनांवरील कमी करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काचा चांगलाच लाभ वाहन उद्योगांवर झालेला दिसून आला आहे. जूनमध्ये प्रवासी वाहन विक्री तब्बल १४.७६ टक्क्यांनी उंचावली असून गेल्या १० महिन्यातील ही सर्वात मोठी झेप ठरली आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे मार्चमध्ये सादर करण्यात आलेल्या हंगामी अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्क ६ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांसाठी ते होते. यानंतर आठवडाभराने नव्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ही करसवलत डिसेंबर २०१४ पर्यंत कायम ठेवली.
असे असले तरी जूनपर्यंतच्या मुदतीचा लाभ वाहन खरेदीदारांनी उठविलेला दिसतो. मुदतीनंतर शुल्क वाढण्याच्या भितीनेही वाहनांची विक्री वाढली गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या एकटय़ा महिन्यात प्रवासी कार विक्री १४.७६ टक्क्यांनी वाढली आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’तर्फे (सिआम) जाहिर करण्यात आलेल्या जूनमधील आकडेवारीनुसार, १,६०,२३२ वाहने विकली गेली. वर्षभरापूर्वी ही संख्या १,३९,६२४ होती. तर या महिन्यातील एकूण वाहन विक्री १२.१५ टक्क्यांनी उंचावत १५,७८,८८४ झाली आहे.
उत्पादन शुल्कातील कपातीबरोबरच केंद्रात आलेले स्थिर सरकार हेही यासाठी निमित्त ठरले आहे. आता कर कपात विस्तारण्यात आल्याने त्याचा परिणाम आगामी कालावधीतही दिसून येईल.
– विक्रम किर्लोस्कर, ‘सिआम’चे अध्यक्ष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 पीटीआय, नवी दिल्ली

 पीटीआय, नवी दिल्ली