शारीरिक विकलांगतेमुळे नोकऱ्यांच्या बाजारपेठेत इतरांच्या तुलनेत समान संधी नाकारल्या गेलेल्या अशा ‘विशेष-सक्षम’ व्यक्तींसाठी भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने पुढाकार घेताना, ‘मॉन्स्टर डॉट कॉम’ या ऑनलाइन रोजगारवाहिनीच्या सहयोगाने खास संकेतस्थळाचे गुरुवारी अनावरण केले. ‘सीआयआय स्पेशल अॅबिलिटी जॉब्स डॉट इन  नावाच्या या संकेतस्थळावर विशेष-सक्षम मुलामुलींनी नोकरी देऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना एका मंचावर आणले आहेच, शिवाय अशा मुलामुलींनी पायावर उभे राहण्याच्या समान संधीचाही तो एक प्रयत्न आहे, असे या उद्घाटनप्रसंगी सीआयआयच्या पश्चिम विभाग सीएसआर उपसमितीचे अध्यक्ष व रसना प्रा. लि.चे अध्यक्ष पिरूझ खंबाटा यांनी सांगितले. आदित्य बिर्ला सेंटर या जनसामूहिक व ग्रामीण विकासासाठी स्थापित संस्थेच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

Story img Loader