देशातील वैयक्तिक प्रवासी मोटार वाहतूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या कार्सऑनरेन्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भाडेतत्त्वावर देण्यासाठी आलीशान मोटारींची सर्वात मोठी मागणी मर्सिडिझ-बेंझ इंडियाकडे नोंदविली आहे. कार्सऑनरेन्ट कंपनीने मर्सििडझ-बेन्झच्या ‘सी क्लास’ श्रेणीतील १२० आलिशान मोटारी आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या असून देशातील व्यावसायिक वापरासाठी मोटारींची देण्यात आलेली ही सर्वात मोठी मागणी आहे. मर्सििडझ-बेन्झच्या सी क्लास २२० सीडीआय श्रेणीतील १२० आलीशान मोटारी आपल्या ताफ्यात असलेली कार्सऑनरेन्ट ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव विज यांनी एका औपचारिक समारंभात मर्सडिीझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी एबरहार्ड कर्न यांच्याकडून या आलीशान मोटारींच्या किल्ल्या स्वीकारल्या.
देशातील श्रीमंत तरुणवर्गाचा वाढती संख्या आणि त्याला आराम व वैभव याबद्दल आग्रही असलेल्या महत्त्वाकांक्षी तरुणवर्गाची मिळालेली जोड यामुळे देशात आलीशान मोटारींच्या मागणीत मोठ्य़ा प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन आपल्या आलिशान मोटारींच्या ताफ्यात वाढ करण्यासाठी कार्सऑनरेन्ट २०१४-१५ या वर्षांत १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. देशातील ३९ शहरांतील १०० पेक्षा अधिक ठिकाणी आपली सेवा उपलब्ध असलेल्या या कंपनीने आपल्याकडील मोटारींची संख्या २०१७ पर्यंत ३० हजारांवर नेण्याची योजना आखली आहे.
मर्सिडिझच्या १२० ‘सी क्लास’ मोटारी ‘कार्सऑनरेन्ट’च्या ताफ्यात दाखल
देशातील वैयक्तिक प्रवासी मोटार वाहतूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या कार्सऑनरेन्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भाडेतत्त्वावर देण्यासाठी आलीशान मोटारींची सर्वात मोठी मागणी मर्सिडिझ-बेंझ इंडियाकडे नोंदविली आहे.
First published on: 23-08-2014 at 01:17 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carzonrent buys 120 c class to the luxury fleet