यंदाच्या दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची भरपूर खरेदी करून घ्या; नंतर ते अधिक महाग होणार आहे, असा इशाराच केंद्र सरकारने दिला आहे. दिवाळीनंतर सोन्यावर पुन्हा र्निबध लादण्याच्या विचार सरकार करेल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
जेटली म्हणाले की, सध्या सण असल्याने खरेदीदारांच्या उत्साहावर आपण पाणी फिरवू इच्छित नाही. दिवाळी आता काही दिवसांतच संपेल. त्यानंतर त्याबाबत (र्निबधाबाबत) विचार करता येईल.
सोन्यावरील र्निबध वाढविल्यास अथवा सोन्यावरील आयात शुल्क वाढविल्यास वाहन क्षेत्राप्रमाणे दिली जाणारी या क्षेत्रासाठीची सवलतही डिसेंबपर्यंत संपुष्टात येईल.
२०१२-१३ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.८ टक्के अशी विक्रमी चालू खात्यावरील तूट नोंदविणाऱ्या भारतात यानंतर सोने धातूवरील र्निबधांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. त्याचबरोबर सोन्यावरील शुल्कही उंचावण्यात आले होते. सोन्याची नाणी तसेच पदके यांच्या आयातीवर बंदी घालतानाच सोन्यावरील उत्पादन शुल्कही १० टक्क्य़ांवर नेण्यात आले होते. सोन्यासारख्या महागडय़ा वस्तूंची मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या आयातीमुळे गेल्याच महिन्यात व्यापार तूटही १४.२ अब्ज अशी दीड महिन्याच्या उच्चांकावर जाऊन पोहोचली.
दसरा-दिवाळीच्या पूर्वीचा महिना म्हणून सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात ३.७५ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ६८.२५ कोटी डॉलर होती. भारतात जूनपर्यंत महिन्याला १० ते १५ टन सोने आयात होत होते. यानंतर त्यात वाढ होऊ लागली.
सोने खरेदी दिवाळीतच करून घ्या; नंतर र्निबध लागू?
यंदाच्या दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची भरपूर खरेदी करून घ्या; नंतर ते अधिक महाग होणार आहे, असा इशाराच केंद्र सरकारने दिला आहे. दिवाळीनंतर सोन्यावर पुन्हा र्निबध लादण्याच्या विचार सरकार करेल,
First published on: 21-10-2014 at 12:47 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre to re look at gold import curbs after diwali jaitley