विमा योजना माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठाशी संलग्न राहण्याकरिता आवश्यक असलेली ‘इन्शुरन्स रिपॉझिटरी सिस्टिम’ सोमवारपासून अस्तित्वात आली. विमा प्राधिकरणाच्या पुढाकाराने धारकांना विम्याशी निगडित सर्व सेवा अद्ययावत साखळीने जोडणाऱ्या या पद्धतीचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केले.
धारकांच्या विमा योजनेतील (पॉलिसी) बदल, अत्याधुनिकता, सुधारणा आदी सेवा या एकाच तंत्रावर होणारी ही सुविधा आहे. याद्वारे धारकांना विशेष सांकेतिक क्रमांकाच्या (युनिक कोड नंबर) आधारे त्यांच्या सर्व योजना पाहता येतील; योजनांचे दावे, वारस, लाभ तसेच इतर माहितीही यामुळे एकाच क्रमांकाद्वारे मिळू शकेल.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने यासाठी अस्तित्वात आणलेली ही जगातील पहिली पद्धती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा