“अलीकडच्या काही वर्षातील अर्थमंत्र्यांच बजेटवर सर्वाधिक वेळ चाललेल भाषण आम्ही ऐकलं. जवळपास १६० मिनिटं हे भाषण सुरु होतं. माझ्यासारखे तुम्ही सुद्धा थकला असाल तर, त्यासाठी मी तुम्हाला जबाबदार धरणार नाही. या अर्थसंकल्पातून नेमका काय संदेश द्यायचा होता, ते मला सुद्धा समजलेलं नाही. स्मरणात राहिल अशी एखादी कल्पना किंवा वाक्य मला आठवत नाही” अशा शब्दात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली.
अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्याच्या मुद्दावर सरकारने हार मानली आहे असे चिदंबरम म्हणाले. एक ते दहामध्ये तुम्ही बजेटला किती अंक द्याल या प्रश्नावर ते म्हणाले की, एक आणि शून्यमध्ये तुम्ही काहीही निवडा.
१० या आकडयामध्ये एक आणि शून्य येतो. यातले तुम्ही काहीही निवडा असे उत्तर त्यांनी दिले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला.