७ टक्क्य़ांच्या खाली अर्थगती नोंदविणाऱ्या चीनी भांडवली बाजारपेठेत बुधवारी गहजब झाला. केवळ देशातीलच नव्हे तर आशियातील प्रमुख निर्देशक समजले जाणाऱ्या बाजारात ५ टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदली गेली. एकाच सत्रातील या अस्वस्थतेपोटी बाजार अर्थव्यवस्थेतून ३ लाख कोटी डॉलर रिते झाले. हाँग काँगच्या हँग सँगने तर ६ टक्क्य़ांच्या रुपात ऑक्टोबर २००८ नंतरची सर्वात मोठी आपटी बुधवारी नोंदविली.
शांघाय कम्पोझिट निर्देशांक ५.९, शेनझेन कम्पोनेन्ट २.९४ टक्क्य़ांनी घसरला. दिवसअखेर एकूण २,८०० कंपन्यांपैकी निम्म्याहून अधिक समभागांचे व्यवहार ठप्प करण्यात आले. मंगळवारीही २०३ कंपन्यांचे व्यवहार बंद करण्यात आले होते. हवाई सेवा, निर्मिती, वैद्यकीय निगा, इंटरनेट, वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग १० टक्क्य़ांपर्यंत आपटले होते. जूनमध्ये तेजीवर असणारा शांघाय निर्देशांक आता ३० टक्क्य़ांनी खाली आला आहे.
सकाळच्या व्यवहारात चीनी बाजारात सूचिबद्ध कंपन्यांपैकी जवळपास निम्मे समभागातील व्यवहार ठप्प झाले होते. हे प्रमाण ४३ टक्के सांगितले जाते. १,२४९ कंपन्यांचे समभाग मूल्य आपटल्याने चीनी बाजारांचे मूल्य २.२ लाख कोटी डॉलरने खालावले. एकूण बाजार मूल्यांच्या तुलनेत ते ३३ टक्के होते. शेनझेनच्या बाजारात ९१७ तर शांघायच्या बाजारात ३३२ समभागांचे व्यवहार सकाळच्या व्यवहारात ठप्प पडले होते.
सरकारकडून जनता आश्वस्त
चीनचे पंतप्रधान लि केकिआन्ग यांनी सोमवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अर्थव्यवस्थेवरील आव्हानांचा मुकाबला करण्याचे आश्वासन दिले होते. आर्थिक उपाययोजनांचा सादर केलेला आराखडाही बाजाराला मोठय़ा घसरणीपासून वाचवू शकला नाही. बुधवारच्या मोठय़ा घसरणीच्या कारण चौकशीचे आदेश सरकारनेही दिले आहेत. चीनी बाजारातील आपटी गेल्या काही आठवडय़ापासून कायम आहे. मात्र बुधवारी त्याने कळस गाठला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सध्या ब्रिक्स दौऱ्यावर आहेत.
बाजार सावरण्यासाठी
सरकारच्या उपाययोजना
तातडीच्या उपाययोजना म्हणून चीनमधील अर्थव्यवस्थेसाठी पावले उचलली जात आहेत. चीनी भांडवली बाजारपेठेत २८ कंपन्यांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया थोपवून ठेवण्यात आली आहे. तर २१ चीनी दलालपेढय़ांना १२० अब्ज युआन (१९.३ अब्ज डॉलर) हे आघाडीच्या ईटीएफ तसेच सेंट्राल हुईजिन या चीनच्या फंडात गुंतविण्यास सांगण्यात आले आहे. त्याचा लाभ अर्थातच मर्यादित कंपन्यांनाच होण्याची शक्यता आहे. चीनी विमा कंपन्यांना आघाडीच्या कोणत्याही एका समभागांमध्ये १० टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक करण्यास सांगण्यात आली आहे. सध्या हे प्रमाण ५ टक्के आहे. ते आता दुप्पट होणार आहे. सरकारच्या मालकीच्या चायना सिक्युरिटीज फायनान्स कंपनीने लघु व मध्यम आकारातील कंपन्यांमधील समभाग खरेदीचे धोरण अवलंबिले आहे. त्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने आर्थिक सहाय्य देऊ केले आहे. चीनच्या मालमत्ता नियामकानेही सरकारी मालकीच्या उद्योगांना सूचिबद्ध कंपन्यांमधील समभाग विकण्यास तूर्त मनाई केली आहे. उलट त्यांच्या बडय़ा अधिकाऱ्यांना समभाग खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोडावती चीनी बाजारपेठ :
शांघाय कम्पोझिट : ३,५०६.७८ (-६.२८%)
शेनझेन कम्पोनेन्ट : ११,०४०.८९ (-२.९४%)
हँग सँग : २३,५१६.५६ (-६.२०%)
आशियाई भांडवली बाजार :
निक्की : १९,७३७३.६४ -६३८.९५ (-३.२४%)
स्ट्रेट टाईम्स : ३,२८४.९९ -५५.९४ (-१.७०%)
तैवान : ८,९७६.११ -२७४.०५ (-३.०५%)
कॉस्पी : २,०१६.२१ -२४.०८ (-१.१९)

रोडावती चीनी बाजारपेठ :
शांघाय कम्पोझिट : ३,५०६.७८ (-६.२८%)
शेनझेन कम्पोनेन्ट : ११,०४०.८९ (-२.९४%)
हँग सँग : २३,५१६.५६ (-६.२०%)
आशियाई भांडवली बाजार :
निक्की : १९,७३७३.६४ -६३८.९५ (-३.२४%)
स्ट्रेट टाईम्स : ३,२८४.९९ -५५.९४ (-१.७०%)
तैवान : ८,९७६.११ -२७४.०५ (-३.०५%)
कॉस्पी : २,०१६.२१ -२४.०८ (-१.१९)