भारतातून उत्पादन घेण्यासाठी २० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा मानस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीनमधील आघाडीच्या १०० हून अधिक मोबाइल हँडसेट आणि पूरक सामग्रीच्या निर्मात्यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित परिषदेत भारताच्या मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात आगामी दोन वर्षांत सुमारे २ ते ३ अब्ज डॉलर (साधारण १३,३५० ते २०,००० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याबद्दल कटिबद्धता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षेला चीनमधून मिळालेले हे मोठे पाठबळ आहे.

टेक्नो, जिओनी, कूलपॅड, हॉलिटेक, विंगटेक, कॅमेरा किंग, गॅलेक्सी कोअर, पॉक्सियाओ, व्हिवो आणि स्प्रोकॉम आदी बडय़ा चिनी कंपन्यांचे मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी येथे आयोजित ‘चायना-इंडिया मोबाइल फोन अँड कम्पोनन्ट मॅन्युफॅक्चिरग समीट’ नावाने सुरू असलेल्या परिषदेत आपली उपस्थिती दर्शविली. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन, स्पाइस, व्होडाफोन आणि इंटेक्स या भारतीय नाममुद्रांचाही परिषदेत सहभाग होता.

परिषदेनिमित्ताने उभय देशांतील हँडसेट निर्मात्यांनी संयुक्त भागीदारीत व्यवसायाच्या संधी धुंडाळाव्यात असे उद्दिष्ट राखण्यात आले होते. प्रत्यक्षात चिनी कंपन्या भारताच्या मोबाइल हँडसेट बाजारपेठेबाबत खूपच उत्साही असल्याचे दिसून आले आणि दोन वर्षांत १३,४०० कोटी रु. ते २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या शक्यताही निर्माण झाल्या. यातून भारतात दोन लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास भारतीय सेल्युलर असोसिएशन (आयसीए)चे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांनी व्यक्त केला.

आयसीए ही भारतातील हँडसेट्स व सुटे घटक उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असून तिने चीनमधील याच धर्तीची संघटना ‘मोबाइल वर्ल्ड (शौजीबाओ)’च्या सहयोगाने पहिल्यांदाच ही परिषद आयोजित करून, दोन्ही देशांतील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणले होते.

बैदूही उत्सुक!

बिजींग: चीनची आघाडीची वेब सेवा प्रदाता कंपनी ‘बैदू’ने भारतातील ई-व्यापारातील नवउद्यमी कंपन्या झोमॅटो, बुकमायशो आणि बिगबास्केटमध्ये गुंतवणुकीचा मानस असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. गुंतवणुकीचे प्रमाण आणि कालावधी मात्र तिने जाहीर केलेला नसला तरी प्राथमिक चाचपणी पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. सध्या बाल्यावस्थेत भारताच्या ई-पेठेला भविष्यातील वाढीच्या शक्यता खूपच उत्साहादायी असल्याचे बैदूच्या प्रवक्त्याने गुंतवणुकीचा बेत वृत्तसंस्थेकडे स्पष्ट करताना मत व्यक्त केले.

मायदेशातील अत्यंत कार्यक्षम आणि उत्पादनास अनुकूल वातावरण पाहता, चिनी कंपन्या  परदेशांतून उत्पादन घेण्याबाबत नाखूश असल्याचे सहसा दिसून येते; परंतु भारतातील मोबाइलची प्रचंड मोठी बाजारपेठ आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे बदलत असलेले व्यावसायिक वातावरण पाहता चिनी कंपन्या मोठय़ा उत्साहाने आपला उत्पादन पाया येथे स्थापू पाहत आहेत.

पंकज मोहिंद्रू, राष्ट्रीय अध्यक्ष आयसीए