मुंबई : कनाकिया समूहातील सिनेलाइन इंडिया लिमिटेडने ‘मूव्हीमॅक्स’ या नव्या अवतारात चित्रपट प्रदर्शनाच्या व्यवसायात तब्बल १० वर्षांच्या खंडानंतर पुन्हा प्रवेश केला असून, आगामी काळात व्यवसाय विस्ताराचे महत्त्वाकांक्षी नियोजन आखले आहे. दरवर्षी नवीन ठिकाणी ७५ ते १०० चित्रपट पटलांची (स्क्रीन) भर घालत, तीन वर्षांत त्यांची संख्या ३०० वर नेण्याचे कंपनीने लक्ष्य राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिनेलाइनने २०१२ मध्ये देशातील सर्वात मोठे प्रदर्शक पीव्हीआर लिमिटेडला तिचा मल्टिप्लेक्स साखळी व्यवसाय ‘सिनेमॅक्स’ या नाममुद्रेसह विकला होती. तथापि, त्यावेळी पीव्हीआरशी केलेल्या करारातील कलमे कालबाह्य झाल्याने, या समूहाने नवीन सिनेगृहांची साखळी ‘मूव्हीमॅक्स’ या नवीन नामाभिधानासह एप्रिल २०२२ पासून सुरू केली आहे.

कंपनीच्या मालकीचे शीवस्थित राणी लक्ष्मीबाई चौकानजीक प्रत्येकी २२० आसनांची क्षमता असलेले तीन मजली तीन पडद्यांच्या मूव्हीमॅक्स सिनेगृहांचे अलीकडे अनावरण केले गेले. राज्यात मुंबईव्यतिरिक्त ठाणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी अशी नऊ मूव्हीमॅक्स सिनेमागृह कंपनीने सुरू केली आहेत.

सिनेलाइन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कनाकिया यांनी स्पष्ट केले की, कंपनीने दरवर्षी ७५ – १०० चित्रपट पटलांची (स्क्रीन) भर घालण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्या अनुषंगाने सध्या ३० ते ४० पटलांसाठी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. राज्याबाहेर गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, अहमदाबाद, उदयपूर आणि हैदराबाद ही या संबंधाने ठिकाणे विचाराधीन आहेत.