आयसीआयसीआय बँकेने गेल्या आठवडय़ात दादरमधील (पश्चिम) शिवाजी पार्क येथे नाणे हस्तांतर मेळावा आयोजित केला होता. भारतीय रिझव्र्ह बँकेच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सर्वसमावेशकता विभागाचे सर व्यवस्थापक सी. पटनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यंदाच्या मेळाव्यात १,५०० जण सहभागी झाले. १०, ५, २ व १ रुपयांच्या ५ लाख रुपये मूल्यांच्या चलनी नाण्यांची या वेळी देवाण-घेवाण झाल्याची माहिती देण्यात आली. सर्वसामान्यांना स्वीकार्ह खराब व विविध प्रकारच्या चलनी नोटांऐवजी नव्या नोटा व नाणी देण्यासाठी आयसीआयसीआय बँक विशिष्ट काळाने नाणे हस्तांतर मेळावा आयोजित करत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा