पायाभूत, संरक्षण विभागप्रमुख बनमाळी अग्रवालांकडे सूत्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वीरेंद्र तळेगावकर

सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याद्वारे सरकारच्या बरोबरीने करोना विणाषूविरोधातील लढाईत उतरलेल्या टाटा समूहाने यासाठीच्या नियोजनासाठी एका कृती दलाची स्थापना केली असून विविध पाच टप्प्यावर काम सुरू केले आहे. या पाचही गटावर स्वतंत्र चमूनेत्याची नियुक्ती करण्यात आली असून करोनानंतरच्या उपाययोजनांवर वेगाने कार्य केले जात आहे.

टाटा समूह आणि टाटा सन्समार्फत करोनाविरोधातील लढाईसाठी सरकारला १,५०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देऊ  केले आहे. करोनानंतरच्या आवश्यक उपाययोजनांसाठी टाटा समूह त्वरित कार्यरत झाला असून याकामी  समूहातील अखत्यारितील रुग्णालये, निर्मिती प्रकल्प, उत्पादन सुविधा यांचा उपयोग केला जात आहे.

करोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्यांना वैद्यकीय सुविधा, निवासी, खान-पान प्रत्यक्ष सुविधांसह या कार्यात आवश्यक साहित्य, उपकरणांची निर्मितीही समुहातील संबंधित उपकंपन्यांमार्फत करण्यात आली आहे. त्याचबरोबर समूहातील आदरातिथ्य व्यवसायांतर्गत येणाऱ्या मालमत्ता (हॉटेलच्या खोल्या), रुग्णालये (खाटा) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

करोनावरील उपचारा दरम्यान लागणाऱ्या मास्क, किट आदींसाठी समूहाने ३५० कोटी रुपयांची तरतूद केली असून यातील काही साहित्य स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर काहींची आयात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समुहातील टाटा मोटर्सच्या माध्यमातून व्हेंटिलेटर तयार करण्यात येत असून प्रत्यक्षात ते जूनपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या मोहिमेत करोना रुग्णांवरील उपचारासाठी जवळपास १,००० खाटांची रुग्णालय सुविधा देशभरात विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील केईएम तसेच जमशेदपूरच्या सुविधांचाही समावेश आहे.

येत्या काही दिवसांसाठी करोनाविरोध करावयाच्या उपाययोजनांकरिता टाटा समूहाने कोविड-१९ कृती दलाची स्थापना केली असून टाटा समूहाच्या पायाभूत, संरक्षण विभागाचे अध्यक्ष बनमाळी अग्रवाला यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठीच्या कार्यपद्धतीची विभागवार चमूनेतेही नियुक्त करण्यात आले आहेत. करोनाविषयक उपचारादी सुविधांबरोबरच या विषाणूशी संबंधित निरिक्षणे, आकडेवारी यांची माहिती (डेटा) तंत्रस्नेही मंच माध्यमातून जमा करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.