मौल्यवान धातू आणि अन्य जिनसांकडे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या पाठीचा परिणाम एकूण कमॉडिटी एक्स्चेंज अर्थात जिन्नस बाजारपेठेची उलाढालीत प्रचंड घसरणीत झालेला दिसून येत आहे. १ एप्रिल २०१४ ते १५ मार्चपर्यंत २०१५ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार ही उलाढाल ५६.६८ लाख कोटी रुपये नोंदली गेली. गेल्या वर्षी याच सुमारास या बाजारातील वार्षिक उलाढालीचे प्रमाण ९८.५७ लाख कोटी होते, म्हणजे तब्बल ४१ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
वायदे बाजार आयोग (एफएमसी)च्या मते उलाढालीतील घट ही प्रामुख्याने सोने-चांदी या मौल्यवान धातूंमधील व्यवहारातील नीरसता, त्याचप्रमाणे ऊर्जा, धातू आणि विशिष्ट कृषी उत्पादनांतील घटलेले स्वारस्य हे आहे. एफएमसीकडून प्रसृत माहितीनुसार, मौल्यवान धातूंमधील उलाढाल ५० टक्क्यांनी घटून १५.३३ लाख कोटींवर, तर कृषी उत्पादने आणि धातूंमधील उलाढाल अनुक्रमे ३४ टक्के आणि ३० टक्के इतकी घटली आहे.
आजच्या घडीला देशात चार राष्ट्रीय तर सहा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत जिन्नस बाजारपेठा (कमॉडिटी एक्स्चेंज) कार्यरत आहेत.
Untitled-1

Story img Loader