जर्मनीत हॅनोवर येथे मुख्यालय असलेल्या वाहनांसाठी चासिस, पॉवरट्रेन, वाहनाअंतर्गत पूरक सामग्री ते टायरनिर्मितीच्या व्यवसायात असलेल्या काँटिनेन्टल एजीने देशांतर्गत प्रवासी वाहनांसाठी टायरची निर्मिती उत्तरप्रदेशातील मोदीपुरम येथील प्रकल्पातून सुरू करून, पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. वार्षिक ८ लाख टायर्स निर्मितीची प्रकल्पाची सध्याची स्थापित क्षमता भविष्यात आणखी वाढण्याला वाव आहे. काँटिनेंटल इंडियाचे टायर व्यवसाय विभागाचे प्रमुख निकोलाइ सेट्झर यांनी अलीकडेच या प्रकल्पातून निर्मित भारतीय बाजारपेठेसाठी दाखल झालेली ‘कॉन्टिमॅक्स कॉन्टॅक्ट एमसी ५’ आणि ‘काँटी कम्फर्ट कॉन्टॅक्ट सीसी५’ अशा दोन प्रीमियम टायर्सच्या श्रेणींचे अनावरण केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2014 रोजी प्रकाशित
‘कॉन्टिनेंटल’चा ‘मेक इन इंडिया’ अध्याय
जर्मनीत हॅनोवर येथे मुख्यालय असलेल्या वाहनांसाठी चासिस, पॉवरट्रेन, वाहनाअंतर्गत पूरक सामग्री ते टायरनिर्मितीच्या व्यवसायात असलेल्या काँटिनेन्टल
First published on: 21-11-2014 at 12:30 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continental make in india