कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या विविध कर्ज योजनांच्या व्याजदरात पाव ते अध्र्या टक्क्य़ांनी कपात जाहीर केली आहे. हे नवीन व्याजदर १५ फेब्रुवारी २०१५ पासून लागू होत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने अलीकडेच वैधानिक तरलता प्रमाणात (एसएलआर) अर्धा टक्क्य़ांची कपात केल्याने, बँकेच्या हाती अधिक पैसा आला आहे. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने कॅश क्रेडिट, बिल्स डिस्काऊंटिंग, कृषी व कृषी संबंधित कर्ज योजना व अन्य मुदत कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.

Story img Loader