वाहन निर्मितीवरील वाढत्या खर्चाचे निमित्त करून बजाज आणि होन्डाच्या दुचाकी तब्बल ८०० रुपयांपर्यंत महाग करण्यात आल्या आहेत. बजाज ऑटो वाहनांच्या किंमती ३०० ते ५०० रुपयापर्यंत तर होन्डा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर्स इंडिया कंपनीच्या दुचाकींचे दर २०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पैकी होन्डाची भाववाढ १ एप्रिलपासूनच लागू झाली आहे; तर बजाजने तिच्या सर्व श्रेणीतील वाहनांचे वाढीव दर गेल्या शुक्रवारपासूनच अमलात आणले आहेत. बजाजची सर्वात स्वस्त प्लॅटिना ही बाईक आता ३९,२९३ रुपयांना तर सर्वात महागडी पल्सर ७०,३२१ रुपयांपासून पुढे (एक्स शोरूम-नवी दिल्ली) उपलब्ध होईल. बुधवारी कंपनीची सर्वात स्वस्त बाईक (ड्रीम निओ-रु.४३,१५०) सादर करणाऱ्या जपानच्या होंडा कंपनीनेही वाढीव किमतीसह तिच्या डिओ, अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर या तीन स्कूटर आता ४४,७१८ ते ५३,५४७ रुपयांदरम्यान तर विविध आठ प्रकारांतील मोटरसायकल ४५,१०१ ते १.७७ लाख रुपयांदरम्यान उपलब्ध असतील, असे जाहीर केले आहे.
* होंडाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केईता मुरामात्सु यांनी बुधवारी ‘ड्रीम निओ’ ही कंपनीची सर्वात स्वस्त मोटरसायकल ४३,१५० रुपयांना (एक्स शोरुम-नवी दिल्ली) गुरगाव येथे सादर केली.
दुचाकी महागल्या
वाहन निर्मितीवरील वाढत्या खर्चाचे निमित्त करून बजाज आणि होन्डाच्या दुचाकी तब्बल ८०० रुपयांपर्यंत महाग करण्यात आल्या आहेत. बजाज ऑटो वाहनांच्या किंमती ३०० ते ५०० रुपयापर्यंत तर होन्डा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर्स इंडिया कंपनीच्या दुचाकींचे दर २०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
First published on: 18-04-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Costly two wheeler