तब्बल नऊ वर्षांनंतर देऊ करण्यात येणाऱ्या नव्या बँक परवान्यासाठीच्या रिझव्र्ह बँकेकडे करावे लागणाऱ्या अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असून, अनेक आघाडीच्या बिगर-बँकिंग वित्तसंस्थांनी गेल्या दोन-तीन दिवसात त्यांच्या संचालक मंडळ बैठकीत अर्ज करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे, तर
टपाल विभागाला यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा असेल. बँक व्यवहार सुरू करण्यासाठी १,९०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठीदेखील विभागाला केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी लागणार आहे. यामध्ये बँक म्हणून पात्रतेसाठी आवश्यक रु. ५०० कोटींच्या भागभांडवलाचाही समावेश असेल.
रिझव्र्ह बँकेच्या अटी-शर्तीना डाक विभाग पात्र ठरत असून बँक परवाना निश्चितच मिळेल, असा ठाम विश्वास केंद्रीय दूरसंचार व माहिती-तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला. नव्या बँक परवान्यासाठी रिझव्र्ह बँकेकडे अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३ आहे. महिंद्र फायनान्सने यापूर्वी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
बँक परवाना मिळाल्यानंतर डाक विभाग पहिल्या वर्षांत ५० शाखा सुरू करण्याच्या विचारात आहे, तर येत्या पाच वर्षांत १५० बँक शाखांचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. देशभरात १,५४,८२२ टपाल कार्यालये असून पैकी १,३९,०८६ ही ग्रामीण तर १५,७३६ कार्यालये शहरी भागात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा