वेगाने विस्तारत असलेला ऐषाराम-मनोरंजन क्षेत्रातील समूह कंट्री क्लब इंडिया लि.ने देशभरात फिटनेस सेंटर्सचे जाळे स्थापित करण्याची आणि त्यासाठी रु. ३५० कोटींच्या गुंतवणुकीची योजना घोषित अलीकडेच घोषित केली. अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा ही कंपनीच्या या नव्या विस्तारीत व्यवसायाची सदिच्छा दूत म्हणून करारबद्ध झाली आहे.  आगामी तीन वर्षांत देशभरात १०० फिटनेस सेंटर्स उभारण्याची योजना असल्याचे कंट्री क्लबचे अध्यक्ष वाय. राजीव रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या प्रत्येक फिटनेस सेंटरमध्ये समर्पित आरक्षण दालनही असेल जे कंट्री क्लबच्या कार्डधारक सदस्यांसाठी सहलींचे नियोजनही करून देईल. या प्रत्येकी ४००० ते १०,००० चौरस फूटाच्या अत्याधुनिक कसरतीच्या सामग्रीने सुसज्ज केंद्रासाठी सरासरी ३.५ कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीतर्फे करण्यात येईल, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन वर्षांत कंपनीने देशा-विदेशात साधलेल्या आक्रमक विस्तारावर आजवर सुमारे ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा