पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या स्वातंत्र्यदिनी जाहिर करणार असणारी आर्थिक सर्वसमावेशकता ही भ्रष्टाचाराला आळा घालेल, असा विश्वास गव्हर्नर डॉ. राजन यांनी व्यक्त केला. देशातील सुमार सार्वजनिक सेवा मोडीत काढण्यासही हिच सर्वसमावेशकता सहाय्यकारी ठरेल असा दावा करतानाच ‘क्रोनी कॅपिटॅलिजम’ अर्थात हितसंबंधांना जपणारे आर्थिक धोरण हे  पारदर्शकता आणि स्पर्धेला मारक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
२० व्या ललित दोशी स्मृति व्याखानात ते बोलत होते. ‘क्रोनी कॅपिटॅलिजम’बाबत प्रथमच आपले मत जाहिर करताना गव्हर्नरांनी ही बाब मुक्त व्यापार, संधी आणि आर्थिक विकासासाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये याच विषयावर अधिक चर्चा झाल्याची त्यांनी आठवण करून दिली.

Story img Loader