आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा कमालीने घसरत आहेत. सोमवारी कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप थेट ५० डॉलरच्याही खाली आले. प्रत्येक िपपामागे त्यातील आपटी ही तब्बल २.७३ डॉलर होती. काळ्या सोन्याचा हा गेल्या साडेपाच वर्षांचा तळ आहे. तेलातील ही घसरण प्रति पिंप ३० ते ४० डॉलपर्यंतही येऊ शकते, अशी भीती क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सत्रातील नव्या आठवडय़ाच्या प्रारंभापासूनच कच्च्या तेलाचे दर खालच्या स्तरावर व्यवहार करते झाले. याचवेळी त्यांनी प्रति पिंप ५० डॉलरचाही आकडा सोडला. गेल्या आठवडाअखेर तेलाचे व्यवहार ५१ डॉलरवर सुरू होते.
कच्च्या तेलाची सध्याची किमान पातळी ही एप्रिल २००९ नंतरची आहे. सततच्या तेल दर घसरणीमुळे ते ४० डॉलरवर येतील, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
गेल्याच आठवडय़ात घसरत्या तेल किंमतींमुळे मुंबई शेअर बाजाराने २०१४ मधील पहिली मोठी निर्देशांक आपटी नोंदविली होती. कच्च्या तेलातील नरमाई सलग सातव्या आठवडय़ातील असल्याचे निरिक्षण सिंगापूरच्या यूनायटेड ओव्हरसीज बँकेने म्हटले आहे. तर अमेरिकेच्या प्रसिद्ध गोल्डमॅन सॅक्सने कच्च्या तेलाच्या किंमती कधीही ३० डॉलर प्रति पिंपचा तळ गाठतील, असे म्हटले आहे.
अल्प कालावधीसाठी तेलाच्या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता असून बँकेने डिसेंबर २०१५ अखेपर्यंत तेलाच्या यापूर्वीचा ८४ डॉलरचा अंदाज आता ५० डॉलरवर आणून ठेवला आहे. तर पुढील वर्षांत हे दर ७० डॉलरपुढे असतील, असेही नमूद करण्यात आले आहे.
बँकेने तेलाच्या किंमती १५० डॉलरच्या ऐतिहासिक टप्प्यावर असताना त्या २०० डॉलपर्यंत पोहोचण्याचे भविष्य यापूर्वी वर्तविले होते.
कच्च्या तेलाचे दर आता जून २०१४ मधील १४० डॉलरपेक्षा निम्म्याच्याही खाली आहेत. तेल इंधनाबाबत अमेरिका स्वयंपूर्ण होत असताना अरब देशातील तेल उत्पादकांकडूनही उत्पादन व पुरवठा पुरेसा आहे. दरम्यान, अमेरिकी तेलाचेही दर आता ४७ डॉलर प्रति पिंपच्या घरात आले आहेत.
युरोपच्या मध्यवर्ती बँकेकडून आणखी आर्थिक सवलत कायम राहिल्यास दरांमध्ये मोठा फरक येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
याबाबत रशियन वित्त सेवा समूह असलेल्या व्हीटीबी कॅपिटलचे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ निल मॅककिन्नॉन यांनी म्हटले आहे.
युरोपातील मध्यवर्ती बँकेचे प्रमुख मारिओ ड्रॅगी हे १९ देशांचे सामायिक युरो चलनातील घसरण रोखण्यासाठी रोखे खरेदीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी कायम ठेऊ शकतात, असेही नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा