२००५ पूर्वी सादर करण्यात आलेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची मुदत रिझव्र्ह बँकेने आणखी वाढविली आहे. यानुसार २००५ पूर्वीच्या सर्व नोटा आता ३० जून २०१६ पर्यंत बदलता येतील. २००५ पूर्वीच्या ५०० तसेच १,००० रुपयांच्या नोटाही बदलून घेता येतील, असे रिझव्र्ह बँकेने बुधवारी स्पष्ट केले. २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची यापूर्वीची मुदत येत्या ३१ डिसेंबर २०१५ रोजीची होती. या कालावधीपर्यंत सर्वच बँक शाखांमध्ये २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची सुविधा आहे. मात्र १ जानेवारी २०१६ पासून ही सुविधा रिझव्र्ह बँकेच्या कार्यालयात तसेच मध्यवर्ती बँकेने निवडलेल्या काही बँक शाखांमध्येच उपलब्ध असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ या १३ महिन्यांच्या कालावधीत रिझव्र्ह बँकेकडे २००५ पूर्वीच्या १६४ कोटी नोटा येऊन पडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा