बँक ऑफ बडोदामार्फत विदेशात झालेल्या कोटय़वधींच्या बेकायदेशीर निधी हस्तांतरण प्रकरणाबाबत तपास करणाऱ्या यंत्रणांकडून केंद्रीय दक्षता आयोगाने सविस्तर अहवाल मागविला आहे. आयोगाने बँकेच्या दक्षता अधिकाऱ्यांकडेही विचारणा केली आहे.
सरकारी बँकेच्या दिल्लीतील परकी चलन विनियम शाखेद्वारे हाँगकाँग तसेच दुबई येथील बनावट कंपन्यांच्या खात्यात ६,१७३ कोटी रुपये पाठविण्यात आल्याच्या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण तसेच सक्तवसुली संचालनालय तपास करीत आहेत. उभय तपास यंत्रणांनी बँकांच्या अधिकाऱ्यांसह अनेक जणांना अटकही केली आहे.
आजवरच्या तपासाचा अहवाल देण्याचे तपास यंत्रणांना सांगण्यात आल्याचे मुख्य दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाच्या दक्षता अधिकाऱ्यालाही अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांचा गैरव्यवहारात सहभाग चिंताजनक असून त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे तपासले जाईल व भविष्यात बँकेच्या कार्यपद्धतीत कोणते बदल करता येतील, याचीही चाचपणी होत आहे, असे चौधरी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा