व्याजदराबाबत निर्णय घेण्यासाठी रिझव्र्ह बँकेकरीता महत्त्वाचा ठरणारा घाऊक किंमत निर्देशांक सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ७.२४ टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. आधीच्या महिन्यातील ७.४५ टक्के तर वर्षभरापूर्वीच्या ९.४६ टक्के पातळीवरून झालेल्या या सुधारणेने महागाईदराने चालू वर्षांतील (गेल्या १० महिन्यांतील) नीचांक स्तर दाखविला आहे.
ऐन दिवाळीच्या मोसमात भाज्यांचे दर १.१९ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मात्र बटाटे, कांदे, गहू, डाळी, मसाल्याचे पदार्थ, खाद्यतेल, साखर आदी खाद्यपदार्थाच्या किंमती मात्र चढय़ा राहिल्या आहेत. कांदे, बटाटे या कालावधीत ७२ टक्क्यांनी तर गहू, डाळी २० टक्क्यांनी महागल्या आहेत.
व्याजदर कमी होण्यासाठी रिझव्र्ह बँकेने गृहित धरलेला महागाईदराचा सुसह्य स्तर हा ५ ते ६ टक्के असा आहे. या पातळीवर तो येण्यास आणखी दोन ते तीन महिने लागण्याचा अंदाज रिझव्र्ह बँकेसह धोरणकत्यरंकडूनही व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार व रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनीही, महागाईचा घसरता क्रम स्वागतार्ह असला तरी तो ५ ते ६ टक्के असणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. तर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनीही महागाई कमी होत असली तरी विकासदर कमकुवत आहे, हे लक्षात घेऊन रिझव्र्ह बँक निर्णायक पावले उचलेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
एकूणात येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या आढाव्यातच नव्हे तर जानेवारीमधील तिसऱ्या तिमाहीच्या आढाव्यातही व्याजदर कपातीचे धोरण रिझव्र्ह बँकेकडून लांबणीवर टाकले जाण्याची शक्यता वाढली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा