देशातील बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले असले तरी एकूणच बँकांची वित्तीय स्थिती नक्कीच सुधारेल, असा विश्वास अर्थमंत्री जेटली यांनी व्यक्त केला.
बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण सध्या वरच्या टप्प्यावर असले तरी त्यांच्यावर दबाव असलेल्या अनेक क्षेत्रांची कामगिरी सध्या उंचावत असल्याचे नमूद करून जेटली यांनी येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य चांगल्या मान्सूनने ही क्षेत्रेही सकारात्मक कामगिरी बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडक सहा क्षेत्रांचा बँकांच्या कर्जाबाबत भार असल्याचे स्पष्ट करत जेटली यांनी सार्वजनिक बँकांना मिळणारे सरकारच्या भांडवली आधाराने या बँका पुन्हा नव्या जोमाने उभ्या राहतील, असे नमूद केले.
संसदेच्या येणाऱ्या मान्सून अधिवेशनात बहुप्रतीक्षित वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) निश्चित पारित होईल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला आहे. या विधेयकाला आता क्षेत्रीय राजकीय पक्षही पाठिंबा देत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘रिझव्‍‌र्ह बँक-अर्थ खाते यांच्यात ‘परिपक्व नाते’
केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यामध्ये एक ‘परिपक्व नाते’ असल्याचे मत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. या दोन्ही संस्था सर्वोच्च स्थानी असून दोन्ही यंत्रणा एकमेकांशी सतत संपर्कात तसेच विचारविमर्श करण्यात सहभागी होतात, असेही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांचा मुदतवाढ मिळणार का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा