मुंबई : जागतिक पातळीवर मध्यवर्ती बँकांकडून केली जाणारी आक्रमक व्याज दरवाढ आणि रशिया व उर्वरित जगातील वाढत्या तणावामुळे इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत बनला आहे. परिणामी सोमवारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८२.४० ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली होती. मात्र चलनातील अस्थिरता रोखण्यासाठी बँकांच्या माध्यमातून रिझव्‍‌र्ह बँकेने डॉलर विक्री केल्याने मंगळवारच्या सत्रात रुपयातील घसरण रोखली गेली. मंगळवारच्या सत्रात रुपया ५ पैशांनी वधारून ८२.३५ पातळीवर स्थिरावला. परकीय चलन विनिमय मंचावर मंगळवारच्या सत्रात रुपयाने ८२.३२ रुपयांची उच्चांक गाठला, तर ८२.४१ या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला आणि दिवसअखेर तो ८२.३५ पातळीवर बंद झाला.

Story img Loader