सण-समारंभाचे निमित्त साधून एलईडी, एलसीडी तंत्रज्ञान असणाऱ्या दूरचित्रवाणी संचाला (टीव्ही) पसंती दिली जाऊ लागल्याने प्रसंगी ‘डीटीएच’साठीदेखील ‘एचडी’ गुणवत्ताच हवी असा ग्राहकांचा वाढता आग्रह नोंदविला जात आहे. केबलऐवजी सेट टॉप बॉक्स देशभरात अनिवार्य करण्याच्या विस्तारित टप्प्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील प्रसारणासाठी वाढती मागणी निमशहरी भागातूनही येत असल्याचे चित्र आहे.
खरेदीदारांच्या हा नवा कल विस्तृत करताना ‘टाटा स्काय’चे वरिष्ठ अधिकारी विक्रम मेहरा म्हणाले की, ‘हाय डेफिनेशन’ला वाढता प्रतिसाद मिळत आहे. उच्च मध्यमवर्गीयांबरोबरच मध्यमवर्गीय ग्राहक प्रकारातूनही या उत्पादनासाठी वाढती मागणी नोंदली जात आहे. साध्या दुकानदारांनीही या तंत्रज्ञानावर आधारित डीटीएचसाठी आपला क्रमांक लावला आहे. शहरी भागांबरोबरच निमशहरी अगदी गावाच्या पातळीवरही याप्रकारच्या उत्पादनासाठी विचारणा होऊ लागली आहे. दूरचित्रवाणी संचासाठी एलईडी-एलसीडी तंत्रज्ञान आवर्जून विचारणा करणारे आणि ते अंगीकारणे याची संख्या वाढल्याने डीटीएचसाठीदेखील एचडी तंत्रज्ञान मागविण्यावर भर दिला जात आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा टप्पा म्हणून कंपनीने ‘ब्रॉडबॅन्ड कम्युनिकेशन्स ग्रुप’च्या सहकार्याने देशात प्रथमच ‘डीटीएच’साठी ‘एमपीईजी-४ एसडी एसटीबी’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याद्वारे सॅटेलाईटच्या माध्यमातून उच्च गुणवत्ता प्रसारण करणे सुलभ होणार आहे. देशभरातील दूरचित्रवाणी संचांना डिसेंबर २०१४ पर्यंत सेट टॉप बॉक्स जोडणे टप्प्या-टप्प्याने अनिवार्य करण्यात आले आहे. उर्वरित दोन टप्प्यासाठी ७.५ कोटी सेट टॉप बॉक्सची गरज मांडली गेली आहे. जागतिक स्तरावर ही मागणी १,२०० कोटी डॉलरच्या रकमेतील आहे.
‘एचडी’ ‘डीटीएच’ला वाढती मागणी
सण-समारंभाचे निमित्त साधून एलईडी, एलसीडी तंत्रज्ञान असणाऱ्या दूरचित्रवाणी संचाला (टीव्ही) पसंती दिली जाऊ लागल्याने प्रसंगी ‘डीटीएच’साठीदेखील ‘एचडी’ गुणवत्ताच हवी
First published on: 10-08-2013 at 03:20 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand rises of hd dth led lcd tv in festive season