दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) आणि प्रुडेन्शिअल फायनान्शिअल इंकने (पीएफआय) नियामकांची परवानगी मिळाल्यानंतर भारतातील ग्राहकांना जीवन विम्याच्या योजना उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त उद्यमाचा व्यवहार पूर्ण केला. या करारानुसार, डीएचएफएलने आपल्या प्रवर्तकांच्या साथीने डीएलएफ प्रमेरिका लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (डीपीएलआय) मध्ये डीएलएफचा ७४ टक्के हिस्सा खरेदी केला. राष्ट्रीय गृह बँकचा गरजेनुसार ५० टक्के हिस्सा डीएचएफएलने खरेदी केला असून उर्वरित दोन प्रवर्तकांनी प्रत्येकी १२ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.
या जीवन विमा कंपनीचे नाव डीएचएफएल प्रमेरिका लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (डीएचएफएल प्रमेरिका) असे लवकरच करण्यात येणार आहे. ते नियामक मंडळाच्या परवानगीसाठी थांबले आहे. याशिवाय व्यवस्थापकीय संचालक, संयुक्त उद्यमाच्या संचालक मंडळात डीएचएफएलचे तीन संचालक, पीएफआयचे दोन आणि दोन संचालक स्वतंत्र असतील. डीएचएफएल ही भारतातील दुसरी मोठी गृह वित्त कंपनी आहे. पीएफआय ही वित्त सेवा देणारी जागतिक कंपनी असून प्रमेरिका या नावाखाली कंपनीचा अमेरिकेबाहेर काही ठरावीक देशांमध्ये विमा आदी व्यवसाय आहे.
डीएचएफएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवन या व्यवहाराबाबत म्हणाले की, पीएफआयच्या साथीने डीएचएफएल आता भारतीय जीवन विमा क्षेत्रातही उडी घेत आहे. भारतातील ग्राहकांच्या विमाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ही कंपनी सुरू करण्यात येत आहे. डीएचएफएल समभागधारकांमध्ये दीर्घ काळासाठी चांगले मूल्य निर्माण होईल, अशी आशा आहे. पीएफआयचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय विमा समूहाचे कार्यकारी टिम फेज यांनी डीएचएफएलसोबत दीर्घ काळासाठी भागीदारी राहील, अशी ग्वाही दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा