विजय मल्ल्या प्रवर्तित युनायटेड स्पिरिट्सचे दुसऱ्यांदा समभाग खरेदी करीत ब्रिटनच्या डिआजिओने निम्मा ताबा मिळविला आहे. कंपनीने ११,४४८.९१ कोटी रुपये मोजत अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.
डिआजिओने यंदाचा व्यवहार प्रति समभाग ३,०३० रुपये दराने केला आहे. आधीच्या व्यवहारापेक्षा तो दुपटीपेक्षाही अधिक आहे. कंपनीने यापूर्वी प्रति समभाग १,४४० रुपये दराने २६ टक्के हिस्सा खरेदी केला होता.
डिआजिओने आपल्या रिले बी व्ही या उपकंपनीद्वारे युनायटेड स्पिरिट्समधील उर्वरित २६ टक्के समभाग खरेदीसाठी ३,७७,८५,२१४ समभागांचे व्यवहार पार पाडले आहेत. युनायटेड स्पिरिट्समध्ये डिआजिओचा ५४.७८ टक्के हिस्सा असेल.

Story img Loader