काही प्रकरणांमध्ये नामांकन आणि इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र यांच्यात फरक असू शकतो. मृत्यूपत्र केले असेल आणि त्यात विम्याच्या रकमेचा लाभधारक सुनिश्चित केला असेल तर अन्यत्र केलेल्या कोणत्याही नामांकनापेक्षा मृत्यूपत्रातील नामांकन महत्त्वाचे मानले जाईल. नामांकन म्हणजे संपत्तीच्या वारसाची नेमणूक करण्याचा मार्ग नव्हे.
जीवनविमा पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत आपण जसे प्रीमियम भरतो त्यांच्याबरोबर आपली सर्वात मोठी जबाबदारी असते ती पॉलिसीधारकाच्या मृत्यूप्रसंगी नेमकी कोणत्या लाभधारकाला आíथक मदत मिळणार हे निश्चित करण्याची. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला लाभ मिळवून देणे हेच मुख्यत्त्वेकरुन जीवनविम्याचे उद्दिष्ट असल्यामुळे ‘प्रपोझल फॉर्म’मध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे (नॉमिनी) तपशील सुस्पष्टपणे नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नामांकनाचे महत्त्व
विमाकर्त्यांला ‘विमाधारकाची सूचना’ असे स्वरूप असलेले नामांकन म्हणजे पॉलिसीधारकाचे दुर्दैवाने निधन झाले तर विम्याच्या दाव्याची रक्कम कोणाला प्रदान करायची हे स्पष्ट करण्याचे साधन असते. निवडक प्रकरणांमध्ये असेही घडते की, नामांकनाच्या अभावी पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला अनेक तापदायक अडचणींचा सामना करावा लागतो. सहसा विमाकर्ता दावेदाराकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र (सक्सेशन सर्टििफकेट) किंवा ‘टायटलहोल्डर’ची मागणी करतो. ते न्यायालयातून जारी केले जाते. बहुतेक प्रकरणांमध्ये असे प्रमाणपत्र मिळवणे ही अतिशय किचकट प्रक्रिया असते. प्रस्तावाच्या टप्प्यावरच योग्य काळजी घेतल्यास ती टाळता येते.
नामांकनासाठी पात्रता
अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचे तर नामनिर्देशित व्यक्ती म्हणजे पॉलिसीधारकाने आपल्या मृत्यूच्या प्रसंगात आपल्या जीवनविमा पॉलिसीची दाव्याची रक्कम ज्याला मिळावी, असे प्रस्तावित केले असेल अशी व्यक्ती. नामनिर्देशित व्यक्तीचे विमेदाराच्या आयुष्यात विमाकर्त्यांच्या दृष्टीने सुयोग्य स्थान असणे आवश्यक असते. त्यामुळेच विमाकर्ता प्रस्तावाच्या वेळी नामनिर्देशित व्यक्तीचे संपूर्ण तपशील आणि पॉलिसीधारकाबरोबरचे नाते सुस्पष्ट करण्याचा आग्रह धरतो. ‘प्रपोझल फॉर्म’मध्ये त्याचा सुस्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. नामांकनाबद्दलचा एक महत्त्वाचा कायदा असा आहे की, तुमचा नामनिर्देशित व्यक्ती हा तुमचा कायदेशीर वारस असला पाहिजे. अन्यथा तुमचे नामांकन वैध गृहित धरले जाणार नाही. याचा अर्थ अशा विमा पॉलिसीतून मिळणारी रक्कम ही वारसदाराच्या ताब्यात जात नाही. तो/ती हे त्या रकमेचे केवळ अभिरक्षक राहतात.
भारतीय व्यक्तिगत कायदय़ानुसार आपले पालक, वैवाहिक जोडीदार आणि मुले हे कुटुंबीयच वारसदार बनण्यास पात्र असतात. नामांकन दाखल करताना पत्नी/पती/मुले/पालक यांची नावे आणि तपशील दिले पाहिजेत आणि त्यांचा केवळ एक श्रेणी म्हणून उल्लेख करणे टाळले पाहिजे.
नामनिर्देशित व्यक्ती कायद्याने सज्ञान नसेल तर विमेदाराने एक अभिरक्षक नेमणे गरजेचे असते. त्याच्या ताब्यात दाव्याची रक्कम जाते आणि विमाधारकाने नियुक्त केलेली नामनिर्देशित व्यक्ती जर ती सज्ञान नसेल तर अशी व्यक्ती १८ वर्षांची होईपर्यंत तो/ती सांभाळून ठेवतो. यासाठी मुला/मुलीची जन्मतारीख, तिच्या/त्याच्या नसíगक पालकाचे नाव आणि त्या पालकाबरोबरचे नाते यांचाही स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.
इच्छापत्र आणि नामांकन
काही प्रकरणांमध्ये नामांकन आणि इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र यांच्यात फरक असू शकतो. मृत्यूपत्र केले असेल आणि त्यात विम्याच्या रकमेचा लाभधारक सुनिश्चित केला असेल तर अन्यत्र केलेल्या कोणत्याही नामांकनापेक्षा मृत्यूपत्रातील नामांकन महत्त्वाचे मानले जाईल. नामांकन म्हणजे संपत्तीच्या वारसाची नेमणूक करण्याचा मार्ग नव्हे.
अधिक सुस्पष्टपणे सांगायचे झाल्यास – नामांकन म्हणजे आपण कंपनीला असे सांगण्यासारखे आहे की ‘जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा कृपया क्ष या व्यक्तीला बोलवा आणि तुमच्याकडून पॉलिसीची रक्कम घेऊन जायला सांगा.’ इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र निर्माळा करणे म्हणजे ‘ही मालमत्ता अंतिमत: य या व्यक्तीकडे जायला हवी.’ इथे क्ष आणि य हे तुमच्या निवडीप्रमाणे एकच व्यक्ती असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात.
हे लक्षात ठेवा..
* नामनिर्देशित व्यक्ती किंवा कुटुंबातील कोणत्याही अन्य सदस्याला आपल्या पॉलिसीबद्दल तसेच नामांकनाबद्दल माहिती द्या. म्हणजे तुमच्या गरहजेरीत ते विम्याच्या रकमेचा सर्वोत्तम वापर करू शकतील.
* पॉलिसीच्या मुदतीत दुर्दैवाने नामनिर्देशित व्यक्तीचाच मृत्यू घडून आला तर नव्या नामनिर्देशित व्यक्तीची नेमणूक करणे आवश्यक आहे. विमाकर्त्यांला पर्यायी/नव्या नामनिर्देशित व्यक्तीची माहिती कळवून हे करून घेतले पाहिजे.
* एकाहून अधिक नामनिर्देशित व्यक्ती ही स्थिती सहसा गुंतागुंतीची असते आणि ती कायदेशीर विवादांपर्यंत जाते. विमाकर्त्यांला अन्य सर्व नामनिर्देशित व्यक्तींच्या परवानगीने कोणातरी एका नामनिर्देशित व्यक्तीच्या हातात दाव्याची संपूर्ण रक्कम सोपवणे अधिक पसंत असल्याने सर्व नामनिर्देशित व्यक्तींमध्ये अशा प्रकारच्या एकमताचे कागदपत्र सादर करणे अशा दाव्यांमध्ये आवश्यक ठरते.
* एकाहून अधिक कायदेशीर वारस असल्यास विमाकर्ता ‘जॉइंट डिस्चार्ज स्टेटमेंट’, कायदेशीर पुराव्यात सवलत आणि ‘इन्डेम्निटी बाँड’ मागवू शकतो. ‘क्लेम सेटल’ करताना काही विवाद उद्भवल्यास ही कागदपत्रे विमाकर्त्यांच्या हिताचे लक्षण करतात.
(लेखक बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सचे प्रमुख (तांत्रिक) आहेत.
..तर नामांकनापेक्षा मृत्यूपत्रातील नामांकन महत्त्वाचे!
काही प्रकरणांमध्ये नामांकन आणि इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र यांच्यात फरक असू शकतो. मृत्यूपत्र केले असेल आणि त्यात विम्याच्या रकमेचा लाभधारक सुनिश्चित केला असेल तर अन्यत्र केलेल्या कोणत्याही नामांकनापेक्षा मृत्यूपत्रातील नामांकन महत्त्वाचे मानले जाईल.
First published on: 20-08-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difference between nomination and will