फेसबुक खाते व ट्विटर हँडलही!
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचे व्यवहार पाहणाऱ्या सरकारच्या संघटनेलाही लोकप्रिय समाजमाध्यमाची भुरळ पाडली आहे. सुप्रशासन दिनाचे औचित्य साधून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) तिचे नवे फेसबुक खाते तसेच ट्विटर हँडलही सुरू केले.
भविष्य निर्वाह निधी विभाग हाताळणाऱ्या केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय (स्वतंत्र कार्यभार) यांनी या दोन्ही व्यासपीठावरील संघटनेचे अस्तित्व शुक्रवारी येथे निर्माण केले. याद्वारे संबंधित सदस्य/ग्राहक हे भविष्य निर्वाह निधीबाबतची मते, सूचना तसेच तक्रारी या व्यासपीठावर नोंदवू शकतील.
भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेदारांना फेसबुक व ट्विटरवर हा विभाग अनुक्रमे http://www.facebook.com/socialpfo व http://www.twitter.com/socialpfo येथे हाताळता येईल.
भविष्य निर्वाह निधीची रक्कम खातेदारांना परत मिळविण्यासाठी तसेच याबाबतची स्थिती पाहण्यासाठी संघटनेने नुकतेच तंत्रज्ञानविषयक साहाय्य उपलब्ध करून दिले. मालक कंपन्यांच्या परवानगीविनाही रक्कम काढण्याचा पर्यायही संघटनेने नुकताच सुरू केला आहे.

Story img Loader