मोबाइल आणि इंटरनेटचा वाढत्या वापराने भारतात सुरू झालेल्या डिजिटायझेशनच्या पर्वाने सर्व काही वेगाने विस्तारत असून, नवीन बाजारपेठा आणि तेथपर्यंत पोहोचण्याचे अनेकविध नवे मार्गही पुढे येत आहेत. तथापि, बँकिंग आणि विमा उद्योगासाठी हीच बाब आव्हानात्मक ठरली आहे, नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब या क्षेत्रात आणखी वेगवान होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय विमा व नियामक प्राधिकरण(इर्डा)चे पूर्णवेळ सदस्य नीलेश साठे यांनी केले.

सध्याच्या या नव्या पर्वाने प्रत्येकाला काही ना काही दिले आहे. जसे ई-व्यापारातून नाक्यावरील वाणसामानाच्या विक्रेत्याचा व्यवसाय संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे काळानुरूप सेवा गुणवत्तेत वाढ आणि विश्वासार्हता सांभाळायची झाल्यास वित्तीय सेवा क्षेत्राला त्यांच्या ग्राहकांना डिजिटल पायावर आधारित सेवा-दालन खुले करणे भागच ठरेल, असे साठे यांनी सांगितले. भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’द्वारे आयोजित चौथ्या वित्तीय योजनांच्या वितरणासंबंधी परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत सीआयआय-पीडब्ल्यूसी यांनी तयार केलेल्या ‘रिथिंकिंग डिस्ट्रिब्युशन’ या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्ष आणि काव्‍‌र्ही कॉम्प्युटर शेअरचे व्ही. गणेश, सीआयआय पश्चिम विभागाचे माजी अध्यक्ष आर. मुकुंदन (टाटा स्टील) व्यासपीठावर उपस्थित होते.

Story img Loader