लिनोव्होचे योगा लॅपटॉप
लॅपटॉपमधील अग्रेसर नाममुद्रा लिनोव्होने ‘योगा’ नावाने टॅब्लेट सादर केले असून त्यातील रचनेनुसार ते हवे तसे ठेवून हाताळण्याची सोयही आहे. यामध्ये इंटेल ४ प्रोसेसर असून बॅटरी १८ तास कार्यरत राहू शकते. लॅपटॉपचा आकार १९२०x१२०० असून त्यातील रिअर कॅमेरा हा ८ मेगापिक्सेलचा आहे. लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडिओ, मास्टर वाय-फायही आहे. २०,९९० रुपये किमतीचा २०.३२ सेंमीचा योगा टॅब्लेट२ फ्लिपकार्टवरही खरेदीसाठी उपलब्ध आहे.
क्रोमाची खरेदी सवलत योजना
टाटा समूहातील साखळी विक्रेता दालन असलेल्या ‘क्रोमा’ने दिवाळीनिमित्ताने विशेष सवलत जाहीर केली आहे. यानुसार ४० हजार रुपयांचा ३९ इंची एलईडी टीव्ही २३,९९० रुपयांना; तर ३२ इंची एलईडी टीव्ही १६,९९० रुपयांना; शिवाय टाटा स्काय डीटीएचही दिले जाणार आहे. त्याचबरोबर पहिल्या १०० खरेदीदारांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यांना आकर्षक भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एचडीएफसी क्रेडिट कार्ड, मास्टर कार्डद्वारे खरेदीवर अनुक्रमे ५ टक्के कॅशबॅक तसेच ५ टक्के सवलत देऊ केली आहे. तसेच ३१ ऑक्टोबपर्यंत सुरू असलेल्या योजनेत भाग्यवानांना १५,००० रुपयांपर्यंत मोफत सहलही जिंकता येणार आहे.
‘रोमा’ बटणांना नवा साज
रोमा ही नाममुद्रा अॅन्कर इलेक्ट्रिक्सच्या विद्युत बटणांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या प्रसारासाठी मुख्य कंपनी पॅनासॉनिक समूहाने बटणांच्या रंगीत पट्टय़ांचे सादरीकरण केले आहे. ३ बाय २ फूट आकाराच्या या पट्टय़ांमध्ये रोमाची विविध आकार, रंगातील बटणे समाविष्ट आहेत.
सेटटॉप बॉक्सरहित सॅमसंगचा टीव्ही
एअरटेल डिजिटल टीव्ही व सॅमसंग यांच्या संयुक्त विद्यमाने नवा इंटिग्रेटेड डिजिटल टीव्ही सादर करण्यात आला आहे. सॅमसंगच्या स्मार्टडायरेक्ट टीव्हीच्या व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या या टीव्हीमध्ये एअरटेलचे डीटीएच टीव्ही स्मार्ट कार्ड अंतर्भूत आहे. यासाठी स्वतंत्र असा सेट टॉप बॉक्स बाहेरून लावण्याची गरज नाही. यामुळे सिग्नल कमी मिळण्याचा अथवा आवाज तसेच ध्वनीतील अस्पष्टतेची शक्यता तुरळक असल्याचा दावा उभय कंपन्यांनी केला आहे. आयडीटीव्ही तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेला व अंतर्भूत डीटीएच यंत्रणा असलेला हा भारतातील पहिला टीव्ही आहे. सॅमसंगच्या या टीव्हीची किंमत ४४,९०० रुपये आहे. यामध्ये चार महिन्यांसाठी एअरटेल डीटीएच मोफत देण्यात आले आहे.
‘व्हीआयपी’ची नवीन मोहिम
सणांचे निमित्त साधत ‘व्हीआयपी’ने ‘लाइफ ले के चल’ ही मोहीम पुन्हा एकदा सादर केली आहे. ऑनलाइन तसेच रेडिओ (आठ प्रमुख शहरांमध्ये), सिनेमा (बँग बँग) आदी माध्यमांतूनही या मोहिमेचा प्रसार करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे कंपनीच्या नव्या उत्पादनांची ओळख करून देण्यात येत आहे. यामध्ये १.९ किलो वजनांपासून पुढील विविध आकाराची बॅग उत्पादने आहेत.
दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी ‘कॅम्लिन’ मौज
शालोपयोगी वस्तुविक्रीत अग्रेसर असलेल्या कोकुयो कॅम्लिनने दिवाळीच्या सुट्टीत मुलांच्या कलेला अधिक वाव मिळण्यासाठी कॅम्लिन कलर वर्ल्ड गिफ्ट सेट सादर केला आहे. यामध्ये जम्बो ऑइल पेस्टल्स, वॉटर कलर्स, पेंटिंग ब्रश, कलर पेन्सिल, स्केच पेन, प्लॅस्टिक क्रेयन्स, चित्र काढण्यासाठी कागद आदी वस्तूंचा समावेश आहे. वय वर्षे ६ ते ११ या गटातील मुलांसाठी हा संच उपयोगी पडू शकतो. त्याची किंमत ३५० रुपये आहे. कंपनी कॅमल आणि कॅम्लिन या नाममुद्रेंतर्गत गेल्या आठ दशकांपासून शालेय साहित्यांची निर्मिती व विक्री करते.