गुंतवणूकदारांच्या दृष्टीने एकूण प्रक्रियेत सुलभता आणणारी ‘ई-केवायसी’सारखी अनेक नवीन पावले टाकणाऱ्या ‘सेबी’ने आता डिमॅट खाते उघडताना करावा लागणारा करारनामा आणि त्यापोटी आकारले जाणाऱ्या मुद्रांक शुल्कापासूनही गुंतवणूकदारांना मोकळीक मिळेल, असे ताजे परिपत्रक काढले आहे.
डिमॅटची सुविधा प्रदान करणाऱ्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट अर्थात बँका, दलाल पेढय़ा अथवा वित्तीय संस्थांबरोबर डिमॅट खातेधारकाला विशिष्ट करारनाम्यावर स्वाक्षरी करावी लागत असे. परंतु सेबीने जारी केलेल्या नव्या परिपत्रकाप्रमाणे या करारनाम्याची गरज नसून, त्याऐवजी केवळ ‘हक्क व दायित्व’नामा नावाच्या सामान्य दस्तऐवजावर डिमॅटधारकाला स्वाक्षरी करावी लागेल. या दस्तऐवजाची नोंदणीही आवश्यक नसल्याने मुद्रांक शुल्काची आकारणीही गैरलागू ठरेल. ‘सीडीएसएल’ या डिपॉझिटरी सेवेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये, महाराष्ट्रात मुद्रांक शुल्कापोटी प्रत्येक डिमॅटधारकाला १०० रु. द्यावे लागत असत, यापुढे मात्र गुंतवणूकदारांना हे शुल्क भरावे लागणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा