गेल्या दोन दशकांत भारतात बरेच बदल झालेले आपण पाहिले आहेत. प्रामुख्याने, काम करणाऱ्या लोकसंख्येच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. खरेदी करण्याची क्षमता लक्षणीय वाढली आहे आणि त्यामुळे खर्चही वाढला आहे.
सुधारलेली जीवनशैली, चांगल्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय सुविधा यामुळे सरासरी भारतीयांचे आयुर्मान वाढले आहे. यापूर्वी, पगारदार व्यक्ती ६० व्या वर्षी निवृत्त होत असे आणि वयाच्या ६७ वर्षांपर्यंत जगत असे. परंतु, निवृत्तीनंतरचे आयुर्मान किमान २० वर्षांनी वाढले आहे. त्यामुळे काम करणे थांबवल्यानंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी पुरेसा निधी असणे आवश्यक आहे.
आज एखादी व्यक्ती दरमहा २५,००० रुपये खर्च करत असेल आणि चलनवाढीचा दर ७ टक्के असल्याचे मानल्यास २५ वर्षांनंतर त्या व्यक्तीचा खर्च दरमहा १,३६,००० रुपये असेल. यामध्ये वैद्यकीय खर्च समाविष्ट करायला हवा. वयानुसार हा खर्च वाढतो आणि भेटवस्तूंसारखे कधी कधी उद्भवणारे खर्च गृहित धरता ही रक्कम १,५०,००० रुपयांहून अधिक असू शकते.
खासगी क्षेत्रातील बहुतांश कंपन्या निवृत्तीवेतन देत नाहीत. याबरोबरच, स्वतंत्र कुटुंबाची वाढती पद्धत, आरोग्यसेवेचा वाढता खर्च, चलनवाढीचा दर आदी घटक व्यक्तीने निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नियोजन करणे गरजेचे बनवतात. याचे उठ्ठष्ट निवृत्तीनंतर नियमित पसे मिळणे असे आहे. जेणे करून एखाद्याला आपल्या जीवनशैलीशी तडजोड न करता वाढीव खर्च सांभाळता येतील.
ग्राहकांसाठी आज अशी उत्पादने उपलब्ध आहेत जी त्यांना निवृत्तीसाठी नियोजन करण्यासाठी मदत करतील. निवृत्तीसाठी नियोजन करण्याविषयी जागृतीचे प्रमाण अधिक असून आपल्याकडे अनेक जण त्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी उशीर करतात. सुरुवातीपासून गुंतवणुकीस सुरुवात केल्यास निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी लक्षणीय मदत होईल.
निवृत्तीसाठी नियोजन सुरू करण्याची योग्य वेळ कोणती?
निवृत्तीसाठीच्या नियोजनाबाबत म्हटले जाते की, जितक्या लवकर सुरुवात करू तितके चांगले. परंतु, त्यासाठी कधीच उशीर होत नाही. लवकर सुरुवात केल्याने वेळेचा आणि सोबत चक्रवाढीचा लाभ मिळतो. यामुळे मोठा निधी उभारण्याची संधी मिळते व व्यावसायिक उत्पन्न थांबल्यान नंतर खर्च भागवण्यासाठी व्यक्तीला मदत होते.
माझ्या निवृत्तीसाठी मी कसे नियोजन करावे?
निवृत्तीसाठी नियोजन पुढील ३ सोप्या पायऱ्यांनी करता येईल :
पायरी क्र. १ : निवृत्तीनंतरचे खर्च कसे मोजणे योग्य ठरेल?
तुमचे सध्याचे खर्च विचारात घ्या आणि त्यामध्ये चलनवाढीचा दर, वाढलेला वैद्यकीय खर्च, सुटय़ा, कुटुंबासाठी भेटवस्तू, इ. हेही त्यामध्ये गृहित धरा. त्यानंतर तुम्हाला एक रक्कम मिळेल जी तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असेल. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, चलनवाढीच्या दरामुळे तुमच्या खर्चाच्या रकमेत वाढ होणार आहे (तुम्ही त्याच गोष्टींवर खर्च करत असलात तरी). मुलांचे शिक्षण व तुमचे स्वतचे घर असेल तर भाडे असे खर्च तुम्ही वजा करू शकता.
पायरी क्र २ : बचत करून किती निधी उभारावा लागेल?
तुम्हाला एकदा तुमच्या खर्चाची कल्पना आली की, त्यानुसार किती निधी उभारावा लागेल याचा अंदाज येईल. खर्च भागवण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम. हा बचत केलेला निधी चलनवाढीचा दर विचारात घेऊन केला जाईल.
पायरी क्र. ३ : किती बचत करणे आवश्यक ठरणार आहे?
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी इच्छित निधीसाठी किती पसे बाजूला काढून ठेवायचे ते तुमच्या आíथक स्थितीनुसार ठरेल. आतापासून बचत करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल आणि चक्रवाढीचा लाभ घेता येईल.
एका ३५ वर्षीय व्यक्तीला निवृत्तीनंतरचे खर्च भागवण्यासाठी दरमहा ५०,००० रुपये आवश्यक असतील तर त्याने आतापासून नियोजन करायला हवे.
इच्छित रक्कम उभी करण्यासाठी ७५,००,००० रुपयांचा निधी आवश्यक असेल. यासाठी निवृत्ती योजनेत दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
निवृत्ती योजनेची निवड कशी करावी?
निवृत्ती योजनेची वैशिष्टय़े व शुल्क रचना अभ्यासणे महत्त्वाचे आहे. कमी शुल्क रचना असलेली योजना निवडल्यास तुमच्या गुंतवणुकीमध्ये अधिक रकमेचे योगदान देणे शक्य होते. चांगली निवृत्ती योजना पुढीलप्रमाणे असावी :
१. चलनवाढीवर मात करेल असा परतावा.
२. तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तुमचे गुंतवणूक धोरण ठरवण्याची लवचिकता देते.
३. बाजारातील चढ-उतारांपासून भांडवलाचे रक्षण करते.
४. नियमित बचतीची सवय रुजवते. निधीची उभारणी विनाव्यत्यय होण्याची काळजी घेतली जाईल.
लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेतं.
निवृत्ती नियोजन करा; जीवनशैली कायम राखा..
गेल्या दोन दशकांत भारतात बरेच बदल झालेले आपण पाहिले आहेत. प्रामुख्याने, काम करणाऱ्या लोकसंख्येच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. खरेदी करण्याची क्षमता लक्षणीय वाढली आहे आणि त्यामुळे खर्चही वाढला आहे.
First published on: 15-10-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do retirement planning and keep up lifestyle