गेल्या काही सत्रातील सततच्या घसरणीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा ५५ च्या खाली गेला आहे. १५ नोव्हेंबर रोजी ५४.७० पर्यंत असलेले स्थानिक चलन अमेरिकन डॉलरच्या मात्रेत आता ५५.१२ पर्यंतच्या नीचांकीपर्यंत आले आहे. बुधवारची त्याची दोन पैशांची घसरण ही सलग तिसरी घसरण होती. यामुळे भारतीय चलन अडीच महिन्याच्या खालच्या पातळीवर येऊन ठेपले आहे. यापूर्वी १३ सप्टेंबर रोजी रुपया ५३.४३ या टप्प्यावर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा