औषध गुणवत्तेबाबत नियामकाचा प्रश्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औषधाच्या गुणवत्तेवरून डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजला अमेरिकेच्या औषध नियामकाकडून इशारा मिळाला आहे. कंपनीच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील प्रकल्पात तयार होणाऱ्या औषधाबाबतची ही कारवाई आहे.

डॉ. रेड्डीज लेबोरेटरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. प्रसाद यांनी अमेरिकेच्या औषध नियामकाचे औषध गुणवत्ताबाबतचे पत्र कंपनीला मिळाले असून त्याला लवकरच प्रतिसाद दिला जाईल, असे स्पष्ट केले. तर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी सौमेन चक्रबर्ती यांनी सांगितले की, अमेरिकेतील औषध नियामकाद्वारे कंपनीच्या तीन प्रकल्पांचे पुनर्लेखापरीक्षण केल्यानंतर औषध दर्जा सदोष आढळेल, असा आम्हाला विश्वास आहे.

कंपनीचे आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम व दुव्वडा (विशाखापट्टणम) तसेच तेलंगणामधील मिरयालागुडा येथे औषध उत्पादन प्रकल्प आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या औषधांमध्ये नियमनाचे पालन न झाल्याबाबतचे पत्र अमेरिकी औषध नियामकाने कंपनीला गुरुवारी पाठविले. कंपनीवर यापूर्वी नोव्हेंबर २०१४ तसेच जानेवारी व फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या कारवाईचाच हा भाग असल्याचे मानले जाते.
समभाग मूल्य कोसळले

अमेरिकी औषध नियामकाकडून गुणवत्तेबाबतचे पत्र मिळाल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळविल्यानंतर डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजचा समभाग १५ टक्क्यांनी खाली आला. परिणामी कंपनीचे बाजारमूल्यही सप्ताहअखेरच्या व्यवहारात १०,६२८ कोटी रुपयांनी रोडावले.
व्यवहारात गुरुवारच्या तुलनेत १४.९९ टक्क्यांपर्यंत खाली आलेला कंपनीच्या समभागाला मुंबई शेअर बाजारात शेवटी ३,६२९.५५ रुपये (-१४.६५%) भाव मिळाला. परिणामी कंपनीचे बाजारमूल्य ६१,९१५.९५ कोटी रुपयांवर येऊन ठेपले. या घटनेने कंपनीच्या आर्थिक प्रतिसादावर नजीकच्या कालावधीत विपरीत परिणाम होऊ शकतो, असा अंदाज एंजल ब्रोकिंगच्या औषध विभागाचे संशोधक-उपाध्यक्ष सरबजित कौर नांगरा यांनी व्यक्त केला आहे.