ऑक्टोबरमधील वधारलेला औद्योगिक उत्पादनदर आणि त्याचवेळी नोव्हेंबरमधील वधारत्या महागाईमुळे रिझव्‍‌र्ह बँकेकडून संभाव्य व्याजदर कपातीला फाटा मिळाल्याने भांडवली बाजारावर बुधवारी चांगलाच दबाव निर्माण केला. सलग दोन दिवस प्रारंभिक उसळीनंतर दिवसअखेर घसरण दाखविण्याचा कल मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी कायम ठेवला. आज पुन्हा ३१.८८ अंश घटीनंतर निर्देशांक १९,३५५.२६ पर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ १०.८० अंश नुकसानासह ५,८८८ वर स्थिरावला. बुधवारीही सुरुवातीच्या तेजीमुळे ‘सेन्सेक्स’ दिवसभरात १९,४७८.७९ पर्यंत झेपावला होता. दुपारच्या सत्रापूर्वीच ऑक्टोबरमधील वधारत्या औद्योगिक उत्पादन दरापाठोपाठ नोव्हेंबरमधील वाढत्या महागाईचे आकडे जाहीर होताच बाजारात आघाडीच्या समभागांच्या विक्रीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या तीन सत्रात मिळून निर्देशांकाने शतकी घसरण नोंदविली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक यासारख्या वित्त क्षेत्रातील समभाग तसेच ओएनजीसी, भेल यासारखे आघाडीचे सार्वजनिक कंपन्यांचे समभाग तसेच हिंदुस्थान यूनिलिव्हर, टाटा मोटर्स, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या खाजगी कंपन्यांच्या समभागांची विक्री यावेळी होऊ लागली. ‘सेन्सेक्स’मधील ३०    पैकी २० समभाग घसरणीच्या यादीत होते.    

गुरुवारी जाहीर झालेले औद्योगिक उत्पादनदराचे वाढीव आकडे हे भांडवली बाजाराच्या उभारी देण्यास अपयशी ठरले. गुंतवणूकदारांची अपेक्षा व्याजदर कपातीची आहे व त्याबाबतच शंका आहे.
दिपेन शाह, कोटक सिक्युरिटीज

डिसेंबर २०१२ पर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात होणे अशक्य आहे. कारण महागाई दर अद्यापही अपेक्षेपेक्षा अधिकच आहे. याच चिंतेचे सावट बुधवारी बाजारावर पडलेले पाहायला मिळाले.
भूपाली गुरसले, अर्थतज्ज्ञ, एंजल ब्रोकिंग

Story img Loader