सोमवारपासून सुरू झालेल्या टूजी स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रियेला पहिल्या दिवशी मिळालेल्या सुमार प्रतिसादामुळे सरकारच्या ४० हजार कोटी रुपयांचा महसूलाचे उद्दीष्ट धूसर बनले आहे. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी सायंकाळी उशिरा सहाव्या फेरीपर्यंत कोणीही निविदा भरली नव्हती.
देशातील १२२ परिमंडळात १,८०० मेगाहर्टझ्करिता टूजी तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरविण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, टेलिविंग्स (आधीची टेलिनॉर), व्हिडिओकॉन, आयडिया सेल्युलर या पाच कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभागासाठी यापूर्वी अर्ज केला आहे.
टूजी स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रियेतून सरकारने ४० हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट राखले असले तरी जाणकारांच्या अंदाजाने ही रक्कम १२ हजार कोटी रुपयांच्या वर जाणार नाही. निविदा भरण्याची मुदत सायंकाळी ७.३० ठेवण्यात आली आहे. यानंतर २४० मिनिटांचा विस्तार कालावधी निविदाधारक कंपन्यांना देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया राबविणाऱ्या ई-प्रोक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिजचे उपाध्यक्ष सुरज राधाकृष्णन यांनी म्हटले आहे की, निविदेसाठी दिवसाला सहा ते सात फेऱ्या होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा