विकासाला पूर्वपदावर आणावयाचे झाल्यास योग्य सुशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी गुरुवारी येथे केले.
‘इंडियन र्मचट्स चेंबर’च्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित ‘सुशासनातून विकास’ या परिसंवादात ते बोलत होते. योग्य धोरणे, नेमके नियम याद्वारे अधिक पारदर्शकतेने कारभार चालवला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
चेंबरचे मावळते अध्यक्ष प्रबोध ठक्कर, खासदार तरुण विजय, ओएनजीसीचे अध्यक्ष डी. के. सराफ व सन फार्माचे कार्यकारी संचालक सुधीर वालिया आदी परिसंवादात सहभागी झाले. अॅम्बिट होल्डिंग्जचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वाधवा यांनी त्याचे सूत्रसंचालन केले.
टाटा म्हणाले की, सुशासनाची अंमलबजावणी टाटा समूहात गेल्या अनेक वर्षांंपासून होत आहे. मात्र त्यासाठीचे नियम ज्येष्ठ अधिकाऱ्यांसाठी निराळे व अन्यांसाठी वेगळे, असे असता कामा नये. उलट सुशासनामुळे कंपन्यांच्या कारभारात समानता व पारदर्शकता येते.
सुशासनाच्या गुणवत्तेवर भर देताना टाटा यांनी गुणवत्तेबरोबर त्याची अंमलबजावणी यातून ते कितपत प्रभावी ठरेल हे अवलंबून असल्याचे नमूद केले. सुशासनासाठी योग्य धोरणे, नेमके नियम यांच्याबरोबरच त्या संदर्भाने सक्तीऐवजी स्वयंस्फूर्तता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा