जागतिक स्तरावर मोबाईल फोन खरेदीसाठी अर्थसहाय्यातील अग्रणी ‘होम डिट’ या गैरबँकिंग वित्तसंस्थेने भारतात प्रवेश करून गत चार वर्षांंत चांगला जम बसविला आहे. या युरोपीय कंपनीची भारत ही ११ वी बाजारपेठ आहे. सणासुदीतील खरेदी उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ‘होम क्रेडिट इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेला मासो यांनी सांगितलेले अन्य देशांच्या तुलनेत भारतीय बाजारपेठेचे वेगळेपण..3
- गैरबँकिंग वित्तसंस्थांसाठी भारतात आशादायी चित्र दिसते काय?
स्पर्धक मोठय़ा प्रमाणावर आहेत आणि ही बाब स्वागतार्हच आहे. पारंपरिक बँकिंग सेवांच्या परिघाबाहेर अजूनही मोठा वर्ग असणे ही आमच्या दृष्टीने आशादायी बाब आहे. सव्वाशे कोटी भारतीयांमध्ये संभाव्य १० कोटी पात्र कर्जदारांपर्यंत पोहोचणे हे लक्ष्य ठेऊन आम्ही काम करीत आहोत. आज आम्ही १४ राज्यांतील ४३ शहरांमधील विस्तारात कमावलेल्या १२ लाख ग्राहकांपैकी ७० टक्के हे पहिल्यांदाच कर्ज घेणारे ग्राहक आहेत. तर १४ टक्के ग्राहक हे आमच्याकडूनच दुसरम्य़ांदा कर्ज घेण्यास पात्र ठरलेले आम्ही पाहत आहोत.
- चीन, इंडोनेशिया (आशिया) आणि बेलारूस वा कझाकस्तान (युरोप) यांच्या तुलनेत भारताच्या बाजारपेठेचे आगळेपण काही सांगू शकाल?
भाषा, संस्कृती वेगवेगळ्या असणारम्य़ा बाजारपेठांचे बव्हंशी सारखेपण आश्र्च्र्यकारक आहे. भारतातील आमचा प्रवेश हा येथील अर्थव्यवस्थेने चीनला पिछाडीवर टाकण्याच्या दिशेने सुरू केलेल्या प्रवासाच्या वेळीच नेमका झाला आहे. चीनमध्ये १० वर्षांंपूर्वी जे संRमण आम्ही अनुभवले तेच सध्या येथे सुरू असलेले पाहत आहोत.
ग्राहकांचे बाजार वर्तन जरी सारखेच असले तरी, भारतात ग्राहकांबद्दल, त्यांच्या पतविषयक पूर्वइतिहासाबद्दल माहिती देणाऱ्या ‘सिबिल’सारख्या स्रेतांचा चीन वा कझाकस्तानमध्ये पूर्णपणे अभाव होता. त्यामुळे तेथे पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कर्ज वितरणाचा गाठीशी असलेल्या अनुभवाचा आम्हाला भारतात फायदा होत आहे. भारतात रिझव्र्ह बँकेसारखी सक्षम नियंत्रक यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे येथील ‘आधार’संलग्न वैयक्तिक तपशिलाच्या नोंदी, त्या आधारे ‘ई—केवायसी’ या संपूर्ण जगाच्या तुलनेत अजोड ठरणाऱ्या बाबी आहेत.
- केवळ पाच मिनिटांत पात्रता ठरवून ग्राहकांना कर्ज वितरण आपल्याला कसे करता येते?
केवळ दोन प्रकारचे दस्तऐवज झ्र् निवासाचा पुरावा (आधार कार्ड) आणि ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड) यावरून पहिल्या पाच मिनिटांत आम्ही ग्राहक कर्जास पात्र आहे की नाही हे निर्धारीत करतो.
पहिल्यांदाच कर्ज घेणारा कोणी असेल तर त्याचा सिबिल पत—गुणांक असण्याचा संभव नसतो. मग समाजमाध्यमांमधील त्या ग्राहकाची सRियता, त्यांच्या संपर्कातील मंडळी वगैरेतून विशिष्ट ग्राहकाची परतफेड क्षमता निष्टिद्धr(१५५)त करणारे कौशल्य हेच या क्षेत्रात जोखीम व नफाक्षमता यातील तफावत निष्टिद्धr(१५५)त करते. साधारण ३,००० रुपयांपासून (इष्टद्धr(२२९ी, गीझर, ओव्हन वगैरेसाठी), साध्या स्मार्टफोनसाठी ९,००० रुपयांपर्यंत ते आयफोन असल्यास ६० हजार रुपये आणि दुचाकी असल्यास लाखापर्यंत असे आम्ही किमान सहा महिने ते कमाल दीड वर्षे मुदतीचे कर्ज वितरण करतो.
- ग्राहकांना आकर्षित करणारम्य़ा ‘शून्य व्याजदराचे कर्ज’ या तुमच्या क्षेत्रातील स्पर्धेच्या मंत्राबद्दल काय सांगाल?
खरे सांगायचे शून्य व्याजदराचे कर्ज वगैरे काही नसते. उत्पादक अथवा विRेत्यांकडून मिळणारी किमत सवलत हेच या प्रकरणी व्याज उत्पन्न म्हणून वसुल होत असते. चीनमधील अनेक स्मार्टफोन निर्मात्यांशी आमचे थेट सामंजस्य आहे.
त्यापायी आम्ही उपभोगत असलेल्या किंमत सवलतीचा लाभ आम्ही ग्राहकांना व्याजरूपात अतिरिक्त शुल्क न आकारता प्रदान करतो. देशभरातील ६,००० हून अधिक विRेत्यांच्या माध्यमातून हे कर्ज विRीसमयीच दिले जाते.
- आपल्या एकंदर व्यवसायात महाराष्ट्राचे स्थान काय?
महाराष्ट्र हे देशातील सर्वात वेगाने शहरीकरण होत असलेले राज्य आहे. गेल्या वर्षी या राज्यात आम्ही प्रवेश केला आणि अल्पावधीतच दरमहा दुप्पट दराने आमचा विस्तार सुरू आहे. मुंबई शहरात सध्या ६०० विRी केंद्रांमधून आमचे कर्ज वितरण सुरू आहे.
- भारतीय बाजाराच्या दृष्टीने काही विशेष योजना आहेत काय?
वर उल्लेख केल्याप्रमाणे येथील पक्की नियामक यंत्रणा पाहता, आम्हाला नवनवे प्रयोग करण्याची भरपूर लवचिकता येथे आहे. विखुरलेले किरकोळ विक्रेते ते लार्ज फॉरमॅट संघटित विRी केंद्रे असे चीन वा युरोपात संRमण दिसले आहे.
भारतीय बाजारपेठेने या संRमणापूर्वीच थेट विशाल ई—पेठ (ऑनलाइन) अशी एक पायरी गाळून मजल मारली आहे. हे हेरून ग्राहकांशी भौतिक संपर्क न होता, शुद्ध स्वरूपात ऑनलाइन कर्ज वितरणाचे पर्याय आम्ही आजमावून पाहणार आहोत. सध्या चाचपणी सुरू आहे. पुढील वर्षांपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल.