चालू आर्थिक वर्षांचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत सरकारचा अंदाज यंदा प्रत्यक्षात घसरण्याची भीती पतमानांकन संस्थांनी व्यक्त  केली आहे. २०१५-१६ साठी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने अंदाजित केलेल्या ७.४ टक्के  विकास दरापेक्षा प्रत्यक्षातील दर हा त्याच्यानजीक मात्र कमी राहण्याचे कयास आहेत.
गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादनाचा दर शुक्रवारी जाहीर होत आहे. या पाश्र्वभूमिवर चालू आर्थिक वर्षांतील एकूण वाढत्या विकासदराबाबत मात्र विविध पतमानांकन संस्थांनी साशंकता व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या मूडीजने जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान विकास दर ७.२ टक्के राहिल असे म्हटले आहे. आधीच्या तिमाहीतील ७.५ टक्क्य़ांपेक्षा हा दर कमी असेल. मंदीसदृश स्थितीमुळे यंदा त्यात वाढ होण्याची कमी शक्यता असल्याचे पतसंस्थेने म्हटले आहे.
तर इंडिया रेटिंग्ज अॅन्ड रिसर्चने एकूण आर्थिक वर्षांत विकास दर ७.३ टक्के राहण्याची शक्यता वर्तविली आहे. सरकारचा विविध योजना, प्रकल्पांवरील कमी खर्च त्याला कारणीभूत राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader