मतदानोत्तर चाचण्यांवर फिदा होत गेल्या चार सत्रात २४ हजारापर्यंत विक्रमी मजल मारणाऱ्या सेन्सेक्सने शुक्रवारी प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होताच थेट २५ हजाराला गाठले. तर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडी सरकार निर्विवाद बहुमत मिळवेल, हा कल लक्षात घेत गुंतवणूकदारांनी निफ्टीलाही नव्या विक्रमाची जोड देत तब्बल ७,५०० नजीक नेऊन ठेवले. गुरुवारच्या तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे १,१०० व ३५० पर्यंत अंश वाढ उंचावली. सकाळी १० वाजता हे चित्र असताना व्यवहाराच्या अखेरकडे प्रवास करणारे दोन्ही प्रमुख निर्देशांक त्याच्या सर्वोच्च टप्प्यापासून दूर जाऊ लागले. तरीदेखील त्यातील वाढ ४ टक्क्यांहून अधिक आहेच. दुपापर्यंत २०० हून अधिक कंपनी समभागांनी वर्षांची उच्चांकी स्तर गाठला. मोठय़ा तेजीत राहिलेल्या समभागांमध्ये बँक, पायाभूत सेवा क्षेत्र, ऊर्जा, पोलाद या क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्य उंचावले. दरम्यान, परकी चलन व्यवहारात रुपयाचा प्रवासही सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत ५९ वर राहताना १० महिन्याच्या नव्या उच्चांकावर राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा